‘इंडो आयरिश हॉस्पिटल’मध्ये रुग्णांना परवडतील अशा दरात आरोग्यसेवा- उद्योजक नरेंद्र फिरोदिया
अहमदनगर Indo Irish Hospital : सर्व अद्यावत सुविधांयुक्त असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या “इंडो आयरिश हॉस्पिटल”मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील रुग्णांच्या खिशाला परवडतील अशा माफक दरात सर्व आरोग्यसेवा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे या सेवेचा रुग्णांनी लाभ घ्यावा असं आवाहन अहमदनगर येथील प्रसिद्ध उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी केलं. “इंडो आयरिश हॉस्पिटल“च्या वतीने आयोजित मोफत सर्व आरोग्य तपासणी शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
अनेक आजारांवर तपासण्या प्रत्येक उपकरणाचं मूळतत्व विद्यार्थ्यांनी समजून घ्यावं, नरेंद्र फिरोदिया यांचं आवाहन
इंडो आयरिश हॉस्पिटलमध्ये 10 जून ते 20 जून या कालावधीमध्ये मोफत सर्व रोग तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, पाठ दुखी, गुडघेदुखी, स्त्री रोग, बालरोग, किडनी विकार, डायलेसिस जनरल सर्जरी अशा प्रकारच्या तपासण्या माफक दरात उपलब्ध होणार आहेत.
50 टक्के सवलत
कॅशलेस सुविधा, मोफत रक्तातील साखर तपासणी, 24 तास अत्यावश्यक सेवा व ॲम्बुलन्स सुविधा उपलब्ध, 50 टक्के सवलतीमध्ये उपचार तसंच, सोनोग्राफी, एक्स-रे, पॅथॉलॉजी, सिटीस्कॅन, टू डी इको, ईसीजी, एनजीओग्राफी, वंध्यत्व निवारण व इतर सर्व तपासणीवरही ५० टक्के पर्यंत सवलत दिली जाणार आहे. तरी या शिबिराचा व रुग्णालयामधील विविध आरोग्यसेवांचा रुग्णांनी लाभ घ्यावा असं आवाहन, इंडो आयरिश हॉस्पिटल प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे.
मान्यवरांची उपस्थिती
सोमवारी सुरू झालेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरास रुग्णांचा चांगला प्रतिसाद लाभला. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरी पूजन व दिप प्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन झालं. यावेळी सामाजिक कार्यकर्ते हर्षल आगळे यांनी सूत्रसंचालन केलं. इंडो आयरिश हॉस्पिटलचे संचालक डॉ. दिलीप जोंधळे यांनी हॉस्पिटल विषयी माहिती दिली. पल्लवी जोंधळे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास इंडो आयरिश हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर्स, नर्स व इतर स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होते.