Ashadhi Vari Palkhi 2024: कपाळी अष्टगंध, डोक्यावर फेटा, खांद्यावर भागवत धर्माची पताका घेऊन आणि ग्यानबा तुकारामाचा गजर करत वारकरी विठ्ठलाच्या ओढीने पंढरपुरच्या दिशेने निघालेत. गेल्या अनेक शतकांपासूनची ही वारीची पंरपरा आजही अविरतपणे सुरु आहे. दरम्यान, याच वारीविषयी प्रत्येकाच्या मनात उत्सुकता आहे. त्याच निमित्ताने रेडिओ आशा (Radio Asha) आपल्या श्रोत्यांसाठी ‘रेडिओ आशाची वारी’ (Radio Aashachi Wari) हा खास कार्यक्रम घेऊन येत आहे. या कार्यक्रमातून श्रोत्यांना वारीविषयी आणि संतांनी केलेल्या कार्याची ओळख करून देण्यात येणार आहेत.
Pune News : होय, मी लढणार अन् जिंकणार! भिमालेंनी दंड थोपटल्याने माधुरी मिसाळांना टेन्शन…
रेडिओ आशाने अल्पावधीतचं नगरकरांच्या मनात विशेष स्थान प्राप्त केलं आहे. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून रेडिओ आशा नगरकरांचं मनोरंजन करत आहे. आता आषाढी वारीच्या निमित्ताने रेडिओ आशाने ‘रेडिओ आशाची वारी’ हा भक्तीमय कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून श्रोत्यांना वारकरी सांप्रदाय, वारीचा इतिहास, वारीचे महत्व आणि संतांचे कार्य याविषयी माहिती देण्यात येणार आहे. हा कार्यक्रम 10 जुलैपासून ते 17 जुलैर्यंत असणार आहे. सकाळी 8 ते 10 या वेळात हा कार्यक्रम नगरकरांना ऐकता येणार आहे. या कार्यक्रमात गेल्या अनेक वर्षापासून खंड न पडू देता वारी करणारे वारकरी वारीविषयी संवाद साधणार आहेत.
Zika Virus : सावध राहा, महाराष्ट्रात वाढत आहे झिका व्हायरस, जाणून घ्या लक्षणे
या कार्यक्रमातून श्रोत्यांना संत तुकाराम, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत जनाबाई, संत गोरा कुंभार, संत सावता माळी, संत मुक्ताबाई आणि संत एकनाथ यांच्या जीवनप्रवासाबद्दल, त्यांनी केलेल्या कार्याबद्दल, त्यांच्या अभंगाबद्दल ऐकायला मिळणार आहे.
याशिवाय, ‘वारसा महाराष्ट्राचा’ या कार्यक्रमात 10 जुलै ते 17 जुलै या कालावधीत मंगेश कुलकर्णी हे देखील वारीच्या दिव्य परांपरेविषयी श्रोत्यांना माहिती देणार आहेत. हा कार्यक्रम दुपारी 3 ते 4 या वेळेत प्रसारित होणार आहेत. तर ‘नगर बोलतो’ या कार्यक्रमात भूषण देशमुख संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमात देशमुख हे वारी म्हणजे काय?, वारीचा इतिहास, वारीचे महत्व याविषयी अगदी सोप्या आणि सहज शब्दात माहिती देण्यात आहेत. हा कार्यक्रम दुपारी 12 ते 2 या वेळेत प्रसारित होणार आहे. रेडिओ आशाचे हे भक्तीमय कार्यक्रम श्रोत्यांना 90.00 FM फ्रिक्वेन्सीवर ऐकता येणार आहेत.