Ashutosh Kale VS Snehalata Kolhe : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादीचा अजित पवार गट (Ajit Pawar) सत्तेत सामील झाल्याने कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील (Kopargaon Constituency) चित्र बदललं आहे. एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढलेले आमदार आशुतोष काळे (Ashutosh Kale) आणि माजी आमदार स्नेहलता कोल्हे (Snehalata Kolhe) आता एकत्र दिसू लागले आहेत. दोन्ही नेत्यांकडून आम्हालाच तिकीट मिळणार असा दावा केला जातोय. आज (सोमवार) नगर जिल्ह्याच्या आढावा बैठकीला आलेल्या आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा आहे आणि पुढेंही राहील असे म्हटले आहे.
कोपरगाव पंचायत समिती कार्यालयात शासन आपल्या दारी उपक्रमाच्या तयारीची आढावा बैठक होती. या बैठकीत बोलताना आमदार अशुतोष काळे यांनी विधानसभेच्या तिकिटासंदर्भात माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या समोरच भाष्य केले.
काही दिवसांपूर्वी कोपरगाव पंयायत समितीलच्या कार्यालयात शासन आपल्या दारी उपक्रमाच्या तयारीची आढावा बैठक झाली होती. यावेळी आशुतोष काळे यांनी विधानसभेचे तिकिट मला मिळणार असे स्नेहलता कोल्हे यांच्या समोर म्हटले होते. त्यानंतर भाषणाला उठलेल्या कोल्हे म्हणाल्या होत्या की मलाही आमच्या पक्ष श्रेष्ठींनी आता एबी फॉर्म देऊ का असे विचारले आहे. यानंतर समोर बसलेल्या लोकांमध्ये हशा पिकला होता.
भावी आरोग्य सेवकांसाठी आरोग्यमंत्री सावंतांची मोठी घोषणा…
यासंदर्भात आशुतोष काळे यांना विचारले असता ते म्हणाले की शासन आपल्या दारी कार्यक्रम घेण्यासाठी मी त्यांना विनंती केली होती. त्यामुळे त्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. सध्या तिन्ही पक्षाचे सरकार आहे. कोपरगावचा लोकप्रतिनिधी म्हणून मला जावेच लागणार होते. त्यामुळे आम्ही एकत्र आलो होतो.
मोठी बातमी : वादग्रस्त IPS अधिकारी सौरभ त्रिपाठी पुन्हा सेवेत; ठाकरे सरकारने केले होते निलंबित
आगामी विधानसभा निवडणुकीत स्नेहलता कोल्हे यांनी पाठिंबा द्यावा किंवा नाही द्यावा हा त्यांचा विषय आहे. मी तर नेहमी सांगितले आहे की ज्या पक्षाचे विद्यमान आमदार आहेत. त्या सदस्यांना पुढच्या विधानसभेचे तिकिट दिले जाते. आता काय निर्णय घ्यायचा हे त्यांनी घ्यायचा आहे. हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा आहे आणि पुढेही राहिलं, असे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले.