Download App

Assembly Election Result : राहुरीत धाकधूक! कर्डिले-तनपुरेंमध्ये फक्त तीन आकड्यांचा फरक…

राहुरी मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले 805 मतांनी आघाडीवर आहेत, तर महाविकास आघाडीचे प्राजक्त तनपुरे पिछाडीवर आहेत.

Assembly Election : राहुरी विधानसभा मतदारसंघात (Assembly Election) महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांनी आघाडी घेतल्याचं चित्र दिसून येत आहे. सहाव्या फेरीअखेरीस कर्डिले यांना 34094 तर महाविकास आघाडीचे उमेदवार प्राजक्त तनपुरेंना 33289 मते मिळाली आहेत. 2019 साली महाविकास आघाडीचे प्राजक्त तनपुरे यांनी शिवाजी कर्डिले यांचा अवघ्या मतांनी पराभव केला होता. त्यानंतर आता 2024 साली पुन्हा महायुतीकडून कर्डिलेंनाच मैदानात उतरवण्यात आलं होतं.

सहाव्या फेरी अखेर भारतीय जनता पक्षाचे महायुतीचे उमेदवार शिवाजी कर्डिले ८०५ मतांनी आघाडीवर आहेत. कर्डिले यांना ३४०९४ मते मिळाली आहेत. महायुतीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांना ३३२८९ मते मिळाली आहेत. भाजपचे शिवाजी कर्डिले ८०५ मतांनी आघाडीवर आहेत.

कोकणात महायुती की महाविकास आघाडी? विधानसभा निवडणुकीचा निकाल घ्या जाणून

मागील अनेक दिवसांपासून शिवाजीराव कर्डिले यांनी विजयासाठी कार्यकर्त्यांची मोठी फौज तयार केली होती. राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघात नागरिकांच्या भेटीगाठी घेत कर्डिलेंनी मोट बांधली होती. अनेक तनपुरे समर्थकांनी कर्डिले गटात प्रवेश केल्याचं दिसून आलं होतं. कार्यकर्त्यांची इनकमिंग पाहता कर्डिले यांचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र, मतमोजणीच्या पाचव्या फेरीअखेरीस शिवाजीराव कर्डिले हे तीन आकड्यांचा फरक ठेवण्यात यशस्वी झाले आहेत. अद्यापही मतमोजणी सुरु असून पुढील मतमोजणीमध्ये शिवाजी कर्डिले आघाडीवर येतील, अशी शक्यता आहे.

महाविकास आघाडी सत्ता स्थापन करणार, बहुमताचा आकडा जुळवण्यासाठी खास ‘प्लॅन’ तयार…

follow us