कोकणात महायुतीत महायुतीची सरशी, 18 पैकी 17 जागांवर दणक्यात विजय मिळवला

Konkan Region Maharashtra Assembly Election Result 2024 : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या विभागांपैकी एक म्हणजे कोकण विभाग आहे. कोकणात कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. कोकणातील 15 मतदारसंघांसाठी 128 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल (Maharashtra Assembly Election Result 2024) येण्यास सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात झालीय. राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत पाहायला मिळाली. कोकण म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचं राज्याच्या राजकारणात पाहायला मिळावं. पण यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कोकणातील जनता कोणाला साथ देणार हे स्पष्ट होण्यास सुरुवात झाली (Konkan Assembly Election Result 2024) आहे.
कोकणात महायुती चार जागांवर आघाडीवर आहे, तर महाविकास आघाडी दोन जागांवर आघाडीवर आहे. कोकणातून शिवसेना ठाकरे गटाचे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून उदय सामंत 4 हजार मतांनी आघाडीवर आहे. तर दुसरीकडे कणकवली मतदारसंघातून नितेश राणे 4400 मतांनी आघाडीवर आहे. कोकण विभागातून शिवसेना शिंदे गट 4 जागांवर आघाडीवर आहेत. तर अजित पवार गट 1 जागेवर आघाडीवर आहे. तर शिवसेना ठाकरे गट 1 जागा, राष्ट्रवादी शरद पवार गट 1 जागांवर आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे.
कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. अडीच वर्षांपूर्वी मात्र शिवसेनेमध्ये फूट पडली होती. शिवसेनेचे सहा आमदार फुटून शिंदे गटात गेले. यामुळे शिवसेनेचं राजकीय गणित बदललं. शिवसेनेची ताकद दोन गटांमध्ये विभागली गेलीय. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक विधानसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला. कोकणातील 15 मतदारसंघांसाठी 128 उमेदवार रिंगणात होते. यातील 8 जागांवर शिंदे गट, 4 जागांवर भाजप आणि 2 जागांवर अजित पवार गटाचे उमेदवार विजयी झालेत. तर फक्त 1 जागेवर ठाकरे गटाचा विजय झालाय.
कोकणातील विजयी-पराभूत उमेदवारांची संपूर्ण यादी
मतदारसंघ | विजयी | पराभूत |
दापोली | रामदास कदम (शिवसेना शिंदे गट) | संजय कदम (शिवसेना ठाकरे गट) |
गुहागर | भास्कर जाधव (शिवसेना ठाकरे गट) | राजेश बेंडल (शिवसेना शिंदे गट) |
चिपळूण | शेखर निकम (अजित पवार गट) | प्रशांत यादव (शरद पवार गट) |
रत्नागिरी | उदय सामंत (शिवसेना शिंदे गट) | बाळ माने (ठाकरे गट) |
राजापूर | किरण सामंत (शिंदे गट) | राजन साळवी (ठाकरे गट) |
कणकवली | नितेश राणे (भाजप) | संदेश पारकर (ठाकरे गट) |
कुडाळ | निलेश राणे (शिंदे गट) | वैभव नाईक (शिवसेना ठाकरे गट) |
सावंतवाडी | दीपक केसरकर (शिवसेना शिंदे गट) | राजन तेली (शिवसेना ठाकरे गट) |
पनवेल | प्रशांत ठाकूर (भाजप) | बालाराम पाटील (अपक्ष) |
कर्जत | सदाशिव थोरवे (शिवसेना शिंदे गट) | सुधाकर घारे (अपक्ष) |
श्रीवर्धन | अदिती तटकरे (अजित पवार गट) | अनिल नवगणे (शरद पवार गट) |
उरण | महेश बालदी (भाजप) | प्रीतम म्हात्रे (अपक्ष) |
महाड | भरत गोगावले (शिवसेना शिंदे गट) | स्नेहल जगताप (शिवसेना ठाकरे गट) |
पेण | रवीशेठ पाटील (भाजप) | अतुल म्हात्रे (अपक्ष) |
अलिबाग | महेंद्र दळवी (शिंदे गट) | चित्रलेखा (अपक्ष) |
Assembly Election Result : उत्तर महाराष्ट्रात कोणाची बाजी? भुजबळ, विखे, अन् जगतापांची आघाडी…
कोकणातील 15 मतदारसंघांसाठी 128 उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये आहेत. राज्यात एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. यंदा कोकणात देखील भरघोस मतदान झाल्याचं चित्र आहे. लोकसभा निवडणुकीत मुंबईकरांनी पाठ फिरवल्याचं चित्र होतं. मात्र विधानसभा निवडणुकीत हे चित्र बदललं आहे.
बातमी अपडेट होत आहे…
Maharashtra Assembly Election : मोठी बातमी! अजित पवारांचा कमबॅक, पहिल्या फेरीत आघाडीवर