Maharashtra Assembly Election : मोठी बातमी! पहिला कल भाजपच्या बाजूने
Maharashtra Assembly Election : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election) मत मोजणीची सुरुवात झाली असून सध्या टपाल मोजणीला सुरुवात झाली असून आणि पहिला कल भाजपच्या (BJP) बाजूने आले आहे. तर दुसरा कल काँग्रेसच्या (Congress) बाजूने लागला आहे. काँग्रेसप्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आघाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे. तर संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युगेंद्र पवार (Yugendra Pawar) आघाडीवर आहे.
यावेळी राज्यात मुख्य लढत महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये झाली आहे तर एक्झिट पोलमध्ये महायुतीची सरकार येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर काही एक्झिट पोलमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये ‘काटे की टक्कर’ पाहायला मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आठवण करून द्यावी म्हटलं; बाकी काही नाही, सुषमा अंधारेंनी मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य काढलं उकरून
तर दुसरीकडे पारनेर मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या राणी लंके आघाडीवर असून अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघात आमदार संग्राम जगताप आघाडीवर आहे आणि कर्जत- जामखेड विधानसभा मतदारसंघांमध्ये रोहित पवार आघाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे.
महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये काटे की टक्कर असल्याने निवडून आल्यानंतर पक्षासोबतच राहणार असं प्रतिज्ञापत्र उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी उमेदवारांकडून घेतले आहे. निकालापूर्वीच उद्धव ठाकरे आणि शरद पवार अलर्ट मोडवर आले आहे.
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी विद्यमान आमदार आणि उमेदवारांकडून घेतली प्रतिज्ञापत्र आहे. त्यामध्ये निवडून आल्यानंतर पक्षासोबतच राहणार असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
सध्या समोर आलेल्या कलनुसार
कणकवलीतून नितेश राणे आघाडीवर
राधाकृष्ण विखे पाटील शिर्डीतून आघाडीवर
माहीम विधानसभा मतदार संघात
अमित ठाकरे आघाडीवर
मुंबादेवीतून काँग्रेसचे अमिन पटेल आघाडीवर
पोस्टल मतदानात नगर जिल्ह्यात बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे, अनुराधा नागवडे, राणी लंके, रोहित पवार, संग्राम जगताप आघाडीवर