Download App

अहमदनगर मधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर हल्ला…भाजपच्या नगरसेवकावर गुन्हा दाखल

  • Written By: Last Updated:

Ahmednagar Crime News : अहमदनगर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अंकुश चत्तर यांच्यावर सावेडीतील एकविरा चौकात काल (शनिवारी) रात्री उशिरा प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्याप्रकरणी भाजपच्या एका पदाधिकाऱ्यासह आठ ते दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान घटनेनंतर तोफखाना पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु करण्यात आला आहे. या घटनेमुळे नगर शहरात एकच खळबळ उडाली आहे. (Attack on NCP worker…FIR filed against BJP corporator)

याबाबत अधिक माहिती अशी, नगर शहरातील एकविरा चौकात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असलेले चत्तर यांच्यावर काळ्या रंगाच्या वाहनातून आलेल्या आठ ते दहा जणांनी शनिवारी रात्रीच्या सुमारास प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यामध्ये अंकुश चत्तर गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात मोठा गोंधळ व तणाव निर्माण झाला होता. याघटनेची माहिती पोलिसांना समजताच तातडीने घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा जमा झाला.

विरोधी पक्षनेतेपदासाठी संग्राम थोपटेंनी थोपटले दंड; थेट दिल्लीत लावली फिल्डिंग

दरम्यान या हल्ल्यात जखमी झालेले चत्तर यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती डॉक्टारांनी दिली आहे. या हल्ल्यामुळे सावेडी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. परिसरातील नागरिकांमध्ये कमालीची भीती पसरली आहे. दरम्यान या हल्लाप्रकरणी तोफखाना पोलिसांनी तातडीने आरोपींचा शोध सुरु केला आहे. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी भाजपच्या एका पदाधिकाऱ्यासह आठ ते दहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

Tags

follow us