Download App

नाशिकमध्ये विश्वंभर चौधरींवर हल्ला; भर कार्यक्रमात व्यासपीठावरच घडला प्रकार

Vishwambhar Chaudhary : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे ‘निर्भय बनो’च्या (Nirbhay Bano) कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी (Vishwambhar Chaudhary) यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामागे भाजप, रा.स्व. संघ आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते असल्याचा आरोप विश्वंभर चौधरी यांनी केला आहे. ‘मी सुखरूप आहे. काळजी करू नका’, असेही त्यांनी सोशल मीडियाद्वारे सांगितले आहे.

विश्वंभर चौधरी यांनी सोशल मीडियावर लिहिले आहे की आज सिन्नरला व्याख्यान सुरू झाल्यानंतर काही मिनिटातच स्थानिक भाजपा अध्यक्ष, रा.स्व. संघाचे आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते विनाकारण आक्रमक झाले आणि भाषण बंद करा, रामनवमीला डीजे का वाजवायचा नाही असे प्रश्न ओरडून विचारायला लागले. यापैकी कोणालाही मी ओळखत नाही. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार ते भाजप, रा.स्व. संघ आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते होते, असे त्यांनी म्हटले आहे.

Assembly Election 2023 : केसीआरची ऑफर नाकारली; काँग्रेसला जिंकून देण्यामागे डोकं कुणाचं ?

ते पुढं लिहितात की, मजल इतकी गेली की भाजपाच्या स्थानिक अध्यक्षानं माझ्यासमोरचा माईक अक्षरशः उपटून फेकून दिला. काही कार्यकर्त्यांनी व्यासपीठावर मोडतोड केली आणि एका कार्यकर्त्यानं धक्काबुक्की केली. मी व्याख्यान रद्द करण्याचा निर्णय घेतला कारण सिन्नरमधली कायदा आणि सुव्यवस्था मला बिघडवायची नव्हती. एक जबाबदार नागरिक म्हणून तेच माझं कर्तव्य आहे. अन्यथा पुरोगामी चळवळीतील कार्यकर्तेही आक्रमक झाले असते.

चव्हाण अन् ठाकरे! तेलंगणातील काँग्रेसच्या बंपर विजयामागील दोन मराठी चेहरे

अशा हल्ल्यांनी आम्ही घाबरणार नाही याची नोंद संबंधितांनी घ्यावी. आम्ही निर्भय आहोत, निर्भय राहू. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर बोलून त्यांना या झुंडगिरीची माहिती दिली आहे, असे त्यांनी सांगितले आहे.

Tags

follow us