चव्हाण अन् ठाकरे! तेलंगणातील काँग्रेसच्या बंपर विजयामागील दोन मराठी चेहरे

चव्हाण अन् ठाकरे! तेलंगणातील काँग्रेसच्या बंपर विजयामागील दोन मराठी चेहरे

हैदराबाद : मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये कमळ फुलले असले तरीही तेलंगणामध्ये (Telangana Election Result) काँग्रेसला (Congress) स्पष्ट बहुमत मिळाले आहे. 119 पैकी काँग्रेसने आतापर्यंत 63 जागांवर विजय मिळविला आहे. तर सत्ताधारी भारत राष्ट्र समितीची मोटार अवघ्या 40 जागांवर थांबली आहे. भाजपला तर अवघ्या आठ जागांवरच विजय मिळविता आला आहे.  दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या केसीआर यांच्यासाठी हे आकडे म्हणजे मोठा धक्का मानला जात आहे. तर काँग्रेसला मात्र एक नवीन राज्य मिळाल्याची गुडन्यूज मिळाली आहे. (Ashok Chavan and Manikrao Thackeray played a major role behind Congress’s bumper victory in Telangana)

दरम्यान, काँग्रेसच्या या बंपर विजयामागे दोन मराठी चेहऱ्यांचीही प्रमुख भूमिका आहे. तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून काँग्रेसने ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांची प्रभारीपदी नियुक्ती केली होती. तर  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची काँग्रेसकडून विशेष निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.  विधानपरिषदेवरील आमदारकीची मुदत संपताच ठाकरे यांच्याकडे ही नवी जबाबदारी देण्यात आली होती. यानंतर ठाकरे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रेवंथ रेड्डी यांच्याशी समन्वय साधत संपूर्ण राज्यात तिकीट वाटप, प्रचाराची रणनिती, वातावरण निर्मिती यावर काम केले.

कर्नाटक गमावलं, तेलंगणाने नाकारलं; ‘दक्षिण दिग्विजय’ मोहीम अजूनही भाजपच्या टप्प्याबाहेरच

तर त्याचवेळी तेलंगणा राज्य अशोक चव्हाण यांच्या नांदेड जिल्ह्याशेजारील राज्य म्हणून ओळखले जाते. जिल्ह्यातील देगलूर सारखा तालुका तेलंगणाच्या सीमेवरील तालुका आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांची तेलंगणाशी अत्यंत जुनी ओळख आहे. तेलंगणातील बरेच प्रश्न चव्हाण यांना परिचीत आहेत. सोबतच तेलंगण भारत राष्ट्र समिती आणि भाजप या दोन्ही पक्षांचाही चव्हाण यांचा मोठा अभ्यास आहे. याच गोष्टीचा त्यांना फायदा झाला असल्याचे बोलले जाते.

‘BRS’ची मोटार तेलंगणातच रुतली; आता महाराष्ट्रात भालके, धोंडगे, शेलार, राठोडांचे काय होणार?

तेलंगणात रेवंत रेड्डी होणार मुख्यमंत्री?

काँग्रेसच्या विजयानंतर आता मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून रेवंत रेड्डी यांच्याकडे पाहिलं जात आहे. रेवंत रेड्डी या निवडणुकीत केसीआर (KCR) यांच्याविरोधात मैदानात उतरले होते. निकालानुसार सध्या रेवंत रेड्डी पराभूत झाले आहेत. मात्र तेलंगणात विधानपरिषद असल्याने त्यांना तिथे संधी देऊन मुख्यमंत्रीपदी वर्णी लावली जाऊ शकते, असे बोलले जाते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube