Download App

गणेशची निवडणूक चुरशीची, भर सभेत सुजय विखे रडले

Sujay Vikhe on Ganesh Cooperative Sugar Factory Election : गणेश सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आहे त्या प्रश्नांची जे सभासदांच्या मनामध्ये आहेत. यापलिकडे ही निवडणूक आहे त्या प्रश्नांची जी माझी मुलगी मला विचारते की घरी का येत नाहीत? कारण मी रात्री दोन वाजेपर्यंत कारखान्यावर असतो. ही निवडणूक आहे त्या प्रश्नांची ज्यामध्ये आम्ही आमच्या कुटुंबाचे सुख मागे ठेऊन तुमच्यासाठी जागलो कारण इथला कामगार जगला पाहिजे, असे बोलताना खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांच्या डोळ्यात अश्रु आले होते. पुढं म्हणाले की आज माझ्या डोळ्यात अश्रु आले असतील पण 19 तारखेनंतर कोणाकोणाच्या डोळ्यात अश्रु येतील हे पण सांगणार आहे, असा इशाराही सुजय विखे यांनी दिला.

ते पुढं म्हणाले की गणेश सहकारी साखर कारखान्याच्या (Ganesh Cooperative Sugar Factory Election) प्रचारादरम्यान चर्चा सुरु होती की ही निवडणूक विखेंच्या प्रतिष्ठेची आहे पण ही निवडणूक प्रतिष्ठेची नाही. ही निवडणूक माझ्या मागील सात वर्षाच्या त्यागाची आहे. उच्च शिक्षित खासदार म्हणून आयुष्याचं सोनं करु शकलो असतो पण आयुष्याची सात वर्षे मी कारखान्यासाठी दिले आहेत. ही निवडणूक आमच्या परिवाराच्या त्यागाची आहे कारण कित्येक वाढदिवस झाले पण आम्ही सोबत जेवण करायला कधी गेलो नाही, आम्हाला तुमची कामं करायची होती, असे खासदार सुजय विखे यांनी म्हटले आहे.

राहुरीचा डाव आता शिवाजी कर्डिले श्रीगोंद्यात टाकणार ? जगताप, पाचपुतेंना धडकी !

ही निवडणूक माणुसकीची आणि विश्वासाची आहे. विश्वास त्या लोकांवर ज्यांच्यासाठी आम्ही काम करतो. विकास करतो, निधी आणतो, पाणी आणतो. ही निवडणूक त्या कार्यकर्त्यांच्या विश्वासाची आहे आमचे कार्यकर्ते आम्हाला दगा तर देणार नाही ना? ही निवडणूक आहे त्या प्रत्येक युवक कार्यकर्त्यांवर, प्रत्येक संचालकावर, प्रत्येक ग्रामपंचायात सरपंचावर, प्रत्येक सोसायटीच्या चेअरमनवर, ज्यांना पदं आणि गावाची जबाबदारी देताना गावामध्ये मतभेद झालेले विसरुन संघटनेसाठी उभे राहतील का? त्या विश्वासाची आहे, असे सुजय विखे यांनी म्हटले आहे.

महाविकास आघाडी सरकार पाडण्यात अजित पवारांची मदत; गिरीश महाजनांचा गौप्यस्फोट!

दरम्यान, विखे-थोरातांची प्रतिष्ठा पणाला लागलेला राहाता तालुक्यातील गणेश सहकारी साखर कारखान्यासाठी काल मतदान झाले. यावेळी विखे पितापुत्रांना भाजपमधूनच आव्हान मिळाले आहे. कोपरगावच्या भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे पुत्र विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांनी विखेंच्या विरोधात भूमिका घेत बाळासाहेब थोरातांना (Balasaheb Thorat) साथ दिल्याने या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. उद्या मतमोजणी होणार आहे. विखेंच्या बालेकिल्ल्यात जाऊन थोरात धक्का देतात का हे उद्याच्या निकालातून दिसणार आहे.

Tags

follow us