Download App

Ganesh Sugar Factory Election; ‘ही सुरुवात आहे हे लक्षात ठेवा’, थोरातांचा विखेंवर हल्लाबोल

Ganesh Sugar Factory Election: राहाता येथील गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखेंना (Radhakrishna Vikhe) त्यांच्याच बालेकिल्ल्यात जाऊन धोबीपछाड दिला आहे. गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत दहशतीच्या राजकारणाला सुरुंग लावण्याचे काम झाले. ही सुरुवात आहे हे लक्षात ठेवा, असा इशारा देत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर टीका केली आहे.

बाळासाहेब थोरात म्हणाले की राजकारण करत असताना दशहतीवर राजकारण करायचं, लोकांना पिळून राजकारण करायचं, त्यांना गुलाम बनवून राजकारण करायचं, त्यांची मानसिकता हालाखीची करायची आणि मग म्हणायचं की मत द्या नाहीतर पाहून घेईल. मग लोक मत टाकतात, ही राजकारण करण्याची पद्धत दुर्दैवाने या भागात आहे. या पद्धतीला सुरुंग लावण्याचे काम आणि दहशतीचे झाकण उडवून लावण्याचे काम या निमित्ताने झाले आहे. आणि ही सुरुवात आहे हे लक्षात ठेवा, असा हल्लाबोल बाळासाहेब थोरात यांनी केली.

News Arena India Survey : भुजबळ, झिरवळांचे गड मजबूत, कांदेंना धक्का; नाशकात राष्ट्रवादी भाजपला वरचढ?

सुरुवातील आम्हाला उमेदवार मिळणार नाही असं ते म्हणायचे. जेव्हा वातावरण पाहिले तेव्हा एसीतून उतरुन उन्हात उभा राहिले पण राहाता तालुक्यातील जनतेच्या मनात वेगळा विचार आहे हे त्यांच्या लक्षात आलं नाही. कारण जनतेच्या हिताचा कधी विचार केला नाही फक्त दशहतीने राजकारण कसे करता येईल, तुझ्याकडे पाहुन घेईल.

माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व भाजपाचे युवा नेते विवेक कोल्हे यांच्या गणेश परिवर्तन पॅनलने १९ पैकी १८ जागांवर विजय मिळवत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या जनसेवा पॅनलचा दारुण पराभव केला. त्यांना होम ग्राउंडवर पराभवाचा जबर धक्का देत थोरात-कोल्हे गटाच्या गणेश परिवर्तन मंडळाने गणेश कारखान्यावर आपले वर्चस्व निर्माण केले आहे.

Congress :  युवक काँग्रेसच्या बैठकीत गदारोळ माजवणारे चार पदाधिकारी निलंबित

१९ जागांपैकी १८ जागांवर विजय मिळवत कोल्हे थोरात गटाने गणेश परिसरावरील आपलं वर्चस्व अधोरेखीत केले आहे. मतमोजणीनंतर निकाल जसजसे घोषित होत होते. तसा थोरात कोल्हे गटाच्या कार्यकर्त्ये गुलाबाचे मुक्त उधळण करून फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये जल्लोष करीत होते विजयानंतर विजयी उमेदवारांवर कार्यकर्त्यांनी गुलालाची मुक्त उधळण केली. त्यानंतर बाळासाहेब थोरात, भाजपाचे युवा नेते विवेक कोल्हे पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्यासह विजयी उमेदवार विजयी सभा घेतली.

Tags

follow us

वेब स्टोरीज