Download App

पाण्यासाठी कट्टर विरोधक बाळासाहेब थोरातांना पालकमंत्री विखेंची साथ !

  • Written By: Last Updated:

अहमदनगरः समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार जायकवाडीला पाणी सोडण्यास नगर जिल्ह्यातून प्रखर विरोध होत आहे. सर्वच पक्षाच्या नेत्यांचा विरोध आहे. यातच उत्तरेकडील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasheb Thorat) व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी देखील जायकवाडी धरणात (Jayakwadi Dam) पाणी सोडण्यास विरोध दर्शविला आहे. राजकारणात विखे विरुद्ध थोरात हा संघर्ष नेहमीच पाहायला मिळाला आहे. मात्र असले तरी थोरात यांनी निळवंडे कालव्याचे आवर्तन वाढवले जावे, अशी मागणी केली होती. त्याला सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

World Cup Final : फायनल मॅच तुम्ही विसरणारच नाही; गुजरात सरकारचं सुपरडुपर प्लॅनिंग!

निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून सुरू असलेले आवर्तन वाढवून दुष्काळी भागातील जास्तीत जास्त गावांमधील शेतकऱ्यांना पाणी मिळावे अशी मागणी बाळासाहेब थोरात यांनी केली होती. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली होती. थोरात यांच्या मागणीला यश आले आहे. निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे आवर्तन वाढवले असल्याने याचा फायदा आता शेतकऱ्यांना होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील एक आनंदाचे वातावरण पसरले आहे.

फासावर लटकवलं तरी महाराष्ट्राला झुकू देणार नाही; गुन्हा दाखल झाल्यानंतर आदित्य ठाकरे आक्रमक

सद्यस्थितीला निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून आवर्जून सुरू आहे माध्यमातून दुष्काळी भागातील अनेक गावांमधील बंधारे देखील भरले जात आहे. मात्र यंदाच्या वर्षी पावसाने पाठ फिरवल्याने बळीराजावर संकट उडवले आहे. त्यामुळे पाण्याची वाढती मागणी केली जात आहे. याच अनुषंगाने महसूलमंत्री तसेच आमदार बाळासाहेब थोरात यांनी सरकारकडे आवर्तन वाढवणे याबाबत मागणी केली होती.

डाव्या कालव्यातून पाण्याचे आवर्तन हे सुरू आहे. मात्र असे असतानाही अनेकांनी पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी समोर आल्या. थोरात यांनी पुढाकार घेत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, नगर जिल्ह्याचे पालकमंत्री यांना आवर्तन वाढवून मिळावे, यासंबंधी पत्रव्यवहार केला आहे. थोरात यांच्या मागणीला न्याय देत निळवंडे च्या डाव्या कालव्याचे आवर्तन वाढवले आहे.

Tags

follow us