Download App

अहिल्यानगरमध्ये आढळले गोमांस; हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्रा

अहिल्यानगरच्या कोठला येथील नाल्यास गोमांस आढळून आल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक होत रस्त्यावरील वाहतूक अडवलीयं.

Ahilyanagar News : अहिल्यानगर शहरातील कोठला परिसरात असलेल्या नाल्यात गोमांस आढळून आले. त्यामुळे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील वाहतूक अडवली आहे. घटनेची माहिती मिळाल्यावर आमदार संग्राम जगताप ही घटनास्थळी दाखल झाले आहेत.

ब्रेकिंग : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुराळा पुढच्या वर्षीच उडणार; SC चे मोठे निर्देश

गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्या कत्तलखान्यांवर पोलिस प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आल्यानंतर गोवंशीय जनावरांच्या कत्तलीवर लगाम बसला होता. अशातच गोरक्षकांकडूनही जनावरांची वाहूतक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जात होती. या संपूर्ण प्रक्रियेत आमदार संग्राम जगताप यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसून आलं होतं.

परिवहन मंत्र्यांची स्वारगेट बसस्थानकाला अचानक भेट, अधिकाऱ्यांना झापलं; नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात कत्तलखाने बंद करण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांच्यावतीने अनेकदा आंदोलने करण्यात आली. अखेर कुरेश समाजाने गोवंशीय जनावरांची कत्तल करणार नसल्याचा पवित्रा घेतल्यानतंर गोमांस बंद करण्यात आल्याचं पाहायला मिळत होतं. मात्र, शहरातील मध्यवर्ती भागात कोठला परिसरातील नाल्यामध्ये गोवंशीय जनावरांचे मांस आढळून आल्याने एकच खळबळ उडालीयं.

UPI Payment : आता UPI द्वारे करा 10 लाख रुपयांपर्यंतचे पेमेंट; नवीन नियम आजपासून लागू

ज्या पद्धतीने गोमांस आढळून आले आहे, त्यानुसार पुन्हा एकदा अहिल्यानगर शहरात गोवंशीय जनावरांची कत्तल सुरु झाल्याचं बोललं जात आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी रस्ता अडवत आंदोलन केलंय. यावेळी खुद्द आमदार संग्राम जगताप यांनीही रस्त्यावर ठिय्या देत कत्तलखान्यांवर पोलिस प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, रस्ता अडवत रस्त्याच्या मध्येच ठिय्या आंदोलन केल्याने अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं होतं.

follow us