Bharat Gogawale VS Sunil Tatkare : राजकारणात कोण-कुणाचा कसा कार्यक्रम करेल हे भल्याभल्यांना सांगता येत नाही. रायगड जिल्हा परिषदेचे राजकारण बघ्याना. रायगडमध्ये (Zilla Parishad Raigad) सर्वाधिक 21 सदस्य निवडून आणूनही शिवसेनेला (Shivsena) सत्ता मिळू शकलेली नाही. रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप दोन्ही पक्षांनी एकत्र येत सत्ता स्थापन केलीय. तर तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या भाजपला अध्यक्षपद मिळालंय. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उपाध्यक्ष झालाय. भाजपला बरोबर घेऊन खासदार व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी मंत्री भरतशेठ गोगावलेंचा (Bharat Gogawale) करेक्ट कार्यक्रम कसा केलाय हेच या व्हिडिओतून पाहुया…
रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेमध्ये उभा संघर्ष आहे. शिंदेसेनेचे मंत्री भरतशेठ गोगावले, आमदार महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे हे खासदार सुनील तटकरेंना थेट चँलेज देतात. तटकरे पण थेट तिघांवर वार करून त्यांची राजकीय कोंडी करतात. रायगडमध्ये झेडपी, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीमध्येही तटकरे आणि गोगावलेंमध्ये थेट संघर्ष दिसून आला. शिवसेनेची कोंडी करण्यासाठी अनेक निवडणुकीत अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसेनेची युती झाली आहे. गेल्या महिन्यात झालेल्या रायगडच्या झेडपी निवडणुकीत 59 जागांपैकी शिवसेनेने सर्वाधिक 21 जागा जिंकल्या. तर राष्ट्रवादीचे 16 सदस्य निवडून आले. तर भाजपला 15 जागा मिळाल्या. ठाकरे गटाला पाच, काँग्रेसला दोन जागा मिळाल्या. तर शेकापला एकही जागा जिंकला आलेली नाही.
झेडपीचे अध्यक्षपद खुल्या प्रवर्गाला असल्यामुळे रस्सीखेच होईल, असे वाटत होते. परंतु भाजप-राष्ट्रवादीने एकत्र येऊन युतीची सत्ता स्थापन झाली. या युतीत शिंदेसेनाही सहभागी असल्याचे सांगितले जात आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपचे मंगेश वाकडीकर, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर पाटील यांची निवड झाली आहे. रायगडमध्ये पहिल्यांदाच भाजपचा अध्यक्ष झालाय. निवडीमुळे राष्ट्रवादी व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. परंतु शिवसेनेचे अनेक महत्त्वाचे पदाधिकारी गैरहजर होते. कारण सर्वात मोठ पक्ष असून ही सत्तेत वाटा मिळण्याची शक्यता नसल्याने ते नाराज आहेत.
पालकमंत्रीपदासाठी तटकरेंची फिल्डिंग ? भाजपला अध्यक्षपद सोडलं
भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्या संघर्षमामुळे रायगडचे पालकमंत्री अद्याप ठरलेला नाही. मंत्री भरत गोगावले आणि महिला बालकल्याणमंत्री आदिती तटकरे यांच्यामध्ये पालकमंत्रीपदावरून वाद आहे. महायुतीतील नेत्यांना हा वाद सोडविता आलेला नाही. मुलीला पालकमंत्रीपद मिळावे म्हणून सुनील तटकरे यांनी भाजपला अध्यक्षपद देऊन फिल्डिंग लावल्याचे बोलले जात आहे.
समित्यांमध्ये तरी शिवसेनेला स्थान मिळणार का ?
झेडपीमध्ये कृषी, समाजकल्याण, बांधकाम अशा समित्या असतात. या समित्यांना महत्त्वाच्या असतात. त्यांना महत्त्वाचे निर्णय घेता येतात. त्यामुळे येत्या काळात राष्ट्रवादी-भाजप शिवसेनेला या समित्यांमध्ये तरी स्थान देणार का असा प्रश्न आहे. गोगावले यांची राजकीय कोंडी करण्यासाठी भाजपच्या मदतीने तटकरेंनी मजबूत डाव टाकला आहे. त्यामुळे दोघांमधील राजकीय संघर्ष आणखी टोकाला जाऊ शकतो.
