Sunil Tatkare : 2009 ची लोकसभा निवडणूक राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र लढणार होती; तटकरेंचा गौप्यस्फोट

Sunil Tatkare : 2009 ची लोकसभा निवडणूक राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र लढणार होती; तटकरेंचा गौप्यस्फोट

Sunil Tatkare : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी वेगळी भूमिका घेण्याचा निर्णय तडखाफडकी घेतलेला नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP)या विचाराची सुरुवात 2009 सालापासून सुरु झाल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादी अजितदादा गटाचे नेते खासदार सुनील तटकरे Sunil Tatkareयांनी केला. 2009 ची लोकसभा निवडणूक राष्ट्रवादी-शिवसेना (NCP-Shiv Sena)एकत्र लढणार होती, असेही यावेळी त्यांनी सांगितले. ते गडचिरोलीमध्ये (Gadchiroli)राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्ता-पदाधिकारी संवाद मेळाव्यात बोलत होते.

विश्वचषकात अफगाणिस्तानकडून पहिले शतक, ऑस्ट्रेलियाविरुद्ध इतिहास रचला

यावेळी खासदार सुनील तटकरे म्हणाले की, 2009 साली आम्हा सर्वांना बोलावण्यात आलं. 2009 सालची निवडणूक राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं एकत्र लढण्याची चर्चा झाली होती. जवळपास आम्ही निर्णयाच्या जवळ होतो. मात्र काही कारणास्तव ती चर्चा फिसकटली नाहीतर कदाचित 2009 सालची निवडणूक कदाचित एकत्रित लढली असती, असेही यावेळी सुनील तटकरे म्हणाले.

2014 सालची लोकसभेची निवडणूक भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि शिवसेना यांनी एकत्र लढवायच्या चर्चा जवळपास झाल्या होत्या. मात्र काही कारणास्तव शेवटच्या टप्प्यामध्ये त्या होऊ शकल्या नाही.

2014 च्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे या दोघांनी मिळून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षानं भाजपकडून पाठिंबा मागितला नसताना देखील आम्ही त्यांना पाठिंबा द्यायची अतिघाई त्यावेळी केली. आम्ही त्यावेळी सांगितलं की, महाराष्ट्रामध्ये अस्थिरता नको म्हणून आम्ही हा निर्णय त्या ठिकाणी घेत आहोत.

त्यामुळे भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देण्याचा अजितदादांचा निर्णय 2023 मधला पहिला निर्णय नाही तर तो 2014 मध्येच त्या विचाराची सुरुवात झाली. त्यानंतर अनेक स्थित्यंतरं झाली. माझ्या सांगण्याचा अर्थ एवढाच आहे की, अजितदादांनी घेतलेला निर्णय योग्य आहे. गेले शंभर ते 120 दिवस आपल्यावर टिका टिपणी केली जात होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube