औरंगजेबाचे पोस्टर झळकावल्या प्रकरणी उद्या भिंगार बंद

Ahmednagar News : लव्ह जिहाद आणि धर्मांतरण कायदा करण्यासाठी तसेच अहमदनगर शहरात औरंगजेबाचे पोस्टर झळकवून त्याचा उदो उदो करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, तसेच या घटनांचा निषेध म्हणून भिंगार शहरातील बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी व समस्त भिंगार शहर परिसरातील नागरिकांनी रविवारी भिंगार बंदचे आवाहन केले आहे. अखंड हिंदू समाज यांच्या वतीने भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनला याबाबत निवेदन देण्यात […]

WhatsApp Image 2023 06 10 At 5.30.18 PM

WhatsApp Image 2023 06 10 At 5.30.18 PM

Ahmednagar News : लव्ह जिहाद आणि धर्मांतरण कायदा करण्यासाठी तसेच अहमदनगर शहरात औरंगजेबाचे पोस्टर झळकवून त्याचा उदो उदो करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, तसेच या घटनांचा निषेध म्हणून भिंगार शहरातील बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी व समस्त भिंगार शहर परिसरातील नागरिकांनी रविवारी भिंगार बंदचे आवाहन केले आहे. अखंड हिंदू समाज यांच्या वतीने भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनला याबाबत निवेदन देण्यात आले आहे.(Bhingar closed tomorrow in case of Aurangzeb’s poster being seen)

गेल्या काही दिवसांपासून राज्यात धार्मिक तेढ निर्माण होणाऱ्या घटनांमध्ये वाढ होऊ लागल्या आहेत. यातच अहमदनगर शहरातील मुकुंदनगर भागात औरंगजेबाची पोस्टर झळकवण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. या घटनेनंतर काही हिंदू संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत औरंगजेबाची खुलताबाद येथे असलेली कबर हिंदुत्ववादी संघटनांकडून उखडून टाकण्याचा इशारा देण्यात आला. दरम्यान याच पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून भिंगारमधील आलमगीर येथील औरंगजेबाच्या मदरशाला पोलिस संरक्षण देण्यात आले आहे.

यातच आता या घटनांचे वाढते प्रकार पाहता आता भिंगारमध्ये देखील हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत. या घटनांचा निषेध म्हणून भिंगार बंदची हाक देण्यात आली आहे. याबाबत पोलीस प्रशासनाला निवेदन देखील देण्यात आले आहे.

अजितदादांवर अन्याय झाला का? जयंत पाटलांनी एका वाक्यात स्पष्टपणे दिलं उत्तर

निवेदनात नेमकं काय म्हंटले आहे?

महोदय, आपणास विनंतीपूर्वक निवेदन करीत आहोत की उद्या दिनांक 11 जून रोजी भिंगार बंदची हाक आम्ही शांततापूर्वक मार्गाने देत आहोत. लव्ह जिहाद व धर्मांतरण कायदा करण्यासाठी तसेच शहरात औरंग्याची पोस्टर झळकवून त्याचा उदो उदो करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. तसेच या घटनांचा निषेध म्हणून सदर भिंगार शहरातील बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना विनंती करून उद्या समस्त भिंगार शहर आम्ही शांततेने निषेध म्हणून बंद करण्याचे आवाहन केलेले आहे. तरी पोलीस प्रशासनाकडून सुद्धा योग्य ते सहकार्य करण्यात यावे अशी मागणी अखंड हिंदू समाज भिंगार शहरच्या वतीने करण्यात आली आहे.

Exit mobile version