Download App

“आम्ही कुठे पळून गेलेलो नाही, त्यांचा गैरसमज दूर करू”; रोहित पवारांना विखेंचं सूचक उत्तर

आम्हीही जिल्ह्यातच आहोत याबाबत संपूर्ण माहिती घेऊ. रोहित पवारांचा जो काही गैरसमज झाला असेल तो मी दूर करेल

Sujay Vikhe News : गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये संगमनेरमध्ये आमदार अमोल खाताळ व बाळासाहेब थोरात यांच्यामध्ये वाद पाहायला मिळाला. यावर बोलताना माजी खासदार सुजय विखे म्हणाले संगमनेरच्या जनतेने विकासासाठीच परिवर्तन घडवून आणले आहे यामुळे हा विषय सोडून दिला पाहिजे. मात्र विकासाच्या गोष्टी बाजूला ठेवून दर दिवशी भांडण होणे ही दुर्दैवी बाब आहे. याबाबत मी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिलेली आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये वादविवाद होणार नाही यासंदर्भात तोडगा काढला जाईल असं वक्तव्य यावेळी सुजय विखे यांनी केले.

मराठा आरक्षणासाठी म्हणून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मुंबई येथील आझाद मैदान येथे आंदोलन केले त्यानंतर याबाबत जीआर देखील काढण्यात आलेला आहे. आता पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी अल्टिमेटम दिला आहे यावर बोलताना विखे (Sujay Vikhe) म्हणाले याबाबत तुम्ही मराठा उपसमितीचे अध्यक्ष असलेले राधाकृष्ण विखे यांनाच याबाबत विचारले पाहिजे. तसेच याबाबत अध्यक्ष उपसमिती व माननीय मुख्यमंत्री हेच निर्णय घेतील व जरांगे पाटलांना कळवतील असे यावेळी बोलताना सुजय विखे म्हणाले.

देवा भाऊंची जाहिरात

राज्यभर सध्या देवेंद्र फडणवीस यांची देवाभाऊ नावाचे बॅनर जाहिरात ही झळकत आहे यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी टीका केली आहे. यावर बोलताना सुजय विखे म्हणाले रोहित पवार काय म्हणाले हे मला माहिती नाही मात्र ते मी ऐकून त्यावर योग्य ते उत्तर देईल. आम्ही काय कुठे पळून गेलेलो नाही तेही जिल्ह्यात आहे आम्हीही जिल्ह्यातच आहोत याबाबत संपूर्ण माहिती घेणार त्यानंतर त्यावर ते बोललेलं योग्य राहील. रोहित पवारांचा जो काही गैरसमज झाला असेल तो मी दूर करेल असेही विखे म्हणाले.

Sujay Vikhe : सत्ता बदलल्यानंतर काही नेते पक्ष बदलतात…पुढाऱ्यांवर विश्वास ठेऊ नका; विखेंचा खोचक टोला

महायुतीत कोणतीही धुसफूस नाही

ओबीसी आरक्षणावर बोलताना सुजय विखे म्हणाले मराठा आरक्षणाबद्दल जीआर निघाला याबाबत काहीही संभ्रम असेल तर त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. या मुद्द्यावर मोठे नेते भाष्य करत असतील तर त्यावर ती माझ्यासारख्या छोट्या माणसाने बोलणं संयुक्तिक नाही. कुठल्याही समाजावरती अन्याय होऊ नये ही राज्य शासनाची भूमिका आहे महायुतीमध्ये धुसफूस नाही समज गैरसमज असतात.

नगर मनमाड रस्त्यावर विखेंचे भन्नाट उत्तर

नगर मनमाड रस्त्यावरून आक्रमक होत राष्ट्रवादीचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी आंदोलन केले यावर बोलताना सुजय विखे म्हणाले नगर मनमाड रस्ता प्रश्नावर मला काही विचारूच नका या शब्दात सुजय विखे यांनी नगर मनमाड रस्त्यावर बोलणं टाळलं. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे त्या अनुषंगाने सुजय विखे यांना विचारले असता ते म्हणाले निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच यावर बोलणं योग्य नाही निकाल लागल्यानंतरच मी बोलणार. योग्य ठिकाणी योग्य खुर्चीवर योग्य माणूस सापडेल असं सूचक विधान यावेळी माजी खासदार सुजय विखे यांनी केले.

Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : सुजय विखे-निलेश लंके राजकीय वैर खरंच संपलंय का?

follow us