Download App

‘राजकीय अस्तित्व संपवण्यासाठीच खोटा गुन्हा’; गुन्हा मागे घेण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्याचा मोर्चा

वाळू चोरीचा खोटा गुन्हा दाखल झाल्याप्रकरणी भाजपच्या माजी जिल्हाध्यक्षाने गुन्हा मागे घेण्याच्या मागणीसाठी थेट पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला आहे. भाजपचे प्रदेश चिटणीस अरुण मुंडे यांच्यासह बंधू उदय मुंडे यांच्यावर रस्त्याच्या सिमेंट कॉंक्रीटकरणासाठी आणण्यात आलेला वाळूसाठा चोरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा माझं राजकीय अस्तित्व संपवण्यासाठीच दाखल केला असल्याचा आरोप अरुण मुंडे यांनी केला असून हा दाखल गुन्हा त्वरीत मागे घेण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

Share Market : भाजपच्या दणदणीत विजयानंतर Investor सुसाट; सुरूवातीलाच गुंतवले 4 लाख कोटी

अहमदनगरमधील शेवगावात भाजपच्या गोटात नेहमीच कलह दिसून आलेला आहे. अशातच पिंगेवाडीच्या महिला सरपंचांनी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सर्कल अधिकाऱ्याने पोलिसांत तक्रार दाखल करुन देत गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा दाखल करणाऱ्या सर्कल अधिकाऱ्याने दबावाखाली गुन्हा दाखल केल्याचा दावा अरुण मुंडे यांनी यावेळी केला आहे.

Mizoram Election 2023 : मिझोरामध्ये कोण उधळणार विजयाचा गुलाल? MNF सत्ता शाबुत ठेवेल का?

अरुण मुंडे यांनी वाळू चोरीचा गुन्हा खोटा असून तो मागे घ्यावा या मागणीसाठी आज शेवगाव पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. भाजपच्या अरुण मुंडे यांच्यासह भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड आदींनी पक्षाच्या लोकप्रतिनिधीवर नाव न घेता शाब्दिक टोलेही लगावले आहेत. अरुण मुंडे यांच्यासह त्यांच्या भावावर 24 डिसेंबरला शेवगाव पोलीस ठाण्यात वाळू चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

तेलंगणाच्या विजयाचा जादूगार ‘रेवंत रेड्डी’; मुलीच्या लग्नासाठी मिळला होता फक्त 12 तासांचा जामीन

पिंगेवाडीच्या महिला सरपंचाची याबाबत तक्रार होती. त्यानुसार मंडल अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारी वरून गुन्हा दाखल झाला. मात्र तक्रार दाखल करणाऱ्या मंडल अधिकाऱ्याने त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शेवगाव तहसीलदारांना जबाब देत, आपल्यावर पोलिसांनी दबाव आणून गुन्हा दाखल करण्यास भाग केल्याचा दावा अरुण मुंडे यांनी केला आहे. तसेच आपले वाढते राजकीय अस्तित्व पाहता आपल्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याचे षडयंत्र रचण्यात आले असल्याचा आरोप देखील मुंडे यांनी केला.

दरम्यान, अरुण मुंडे यांनी शेवगाव पोलीस निरीक्षकांच्या कारवाई विरोधात आज पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. संबंधित पोलीस निरीक्षकाला निलंबित करण्यात यावे तसेच आपल्यावरील खोटे गुन्हे दाखल मागे घेण्यात यावे अशी मागणी देखील मुंडे यांनी केली.

Tags

follow us