Download App

“हिंदू मुली म्हणजे मुलं जन्माला घालण्याचं मशीन अन्..”, पडळकरांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

शाळा, कॉलेजांत आपल्या मुली काय करतात याकडे लक्ष देण्याची गरज आहे. हिंदू मुली म्हणजे मुलं जन्माला घालण्याचं मशीन असं सध्या सुरू आहे.

Gopichand Padalkar : भाजपाचा आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जाणारे आमदार गोपीचंद पडळकर  (Gopichand Padalkar) त्यांच्या वक्तव्यांनी नेहमीच चर्चेत असतात. आताही त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. हिंदू मुली म्हणजे मुले जन्माला घालण्याचे मशीन असं सध्या सुरू आहे. मु्स्लीमांत अनेक जाती आहेत. त्यांच्यात लग्न करत नाहीत आणि आमच्या मुली बाटवत आहेत,असे वक्तव्य आमदार पडळकर यांनी केलं आहे. नाशिक येथील (Nashik News) सिडको परिसरात बुधवारी एक सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत बोलताना पडळकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केले.

पडळकर पुढे म्हणाले, शाळा, कॉलेजांत आपल्या मुली काय करतात याकडे लक्ष देण्याची गरज आहे. हिंदू मुली म्हणजे मुलं जन्माला घालण्याचं मशीन असं सध्या सुरू आहे. मुस्लिमांतही अनेक जाती आहेत. त्यांच्यात लग्न करत नाहीत आणि आमच्या मुली बाटवल्या जात आहेत. आज जम्मू काश्मिरची (Jammu Kashmir) परिस्थिती काय आहे. पर्यटक तिथे जातात पण त्यांना त्यांचा धर्म (Pahalgam Terror Attack) विचारुन गोळ्या घातल्या जात आहेत.

Video : शरद पवारांनी फावल्या वेळेत नवा इतिहास लिहावा, गोपीचंद पडळकरांची खोचक टीका

भारतात जे तथाकथित धर्मनिरपेक्ष आहेत त्यांनी या गोळ्या घालणाऱ्यांना त्यांचा धर्म विचारला पाहिजे. औरंगजेबाच्या कबरीचा विषय निघाला की त्यात काही महत्वाचं नाही असं म्हणतात. परंतु, आता येथून पुढे आर्थिक कोंडीची कारवाई करावी लागणार आहे. ज्याच्या डोक्यावर टिळा असेल त्याच्याचकड खरेदी करा. हलाल नेमकं काय आहे. त्याचाच सगळा पैसा हिंदू विरोधी कारवायांसाठी वापरला जातो असा गंभीर आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी यावेळी केला.

राज्यात धर्मांतर अन् लव जिहाद आहेच

यानंतर लव जिहाद आणि धर्मांतराच्या मुद्द्यावरही आमदार पडळकर यांनी भाष्य केलं. राज्यात आणि देशात आजही धर्मांतर सुरू आहे. या सगळ्यांचा विचार करण्याची वेळ आता आली आहे. या गोष्टी घरापर्यंत येण्याची वाट कशाली पाहता. त्यांच्याकडे मिल्ट्री आणि रेल्वेपेक्षा जास्त जागा आहे. वक्फ बोर्ड नेमकं आलं कुठून? औरंग्याच्या काळात तर असं काहीच नव्हतं असेही आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले.

ज्याला नाही अक्कल, त्याचं नाव गोपीचंद पडळकर; ‘त्या’ वक्तव्यावरुन संभाजी ब्रिगेडने वचपाच काढला

follow us