कोपरगावः ब्रिटिशांनी जेवढे पूल बांधले, त्यानंतरच्या काळात एकही पूल उभारला न गेल्यामुळे जोपर्यंत गोदावरी नदीचे पाणी ओसरत नाही तोपर्यंत नागरिकांना कोपरगावला (Kopergaon) जाण्यासाठी कुंभारीवरून धारणगावला व धारणगाववरून कुंभारीला यायचे असल्यास होडीने किंवा हिंगनीमार्गे दूरवरून यावे लागत होते. त्यावेळी होडी नागरिकांची गरज होती. परंतु ज्यावेळी 2004 ला माजी आमदार अशोकराव काळे यांना जनतेने सेवा करण्याची संधी दिली. त्यावेळी त्यांनी सर्वप्रथम धारणगाव कुंभारी पुलाचे काम मार्गी लावून नागरिकांची गेल्या कित्येक दशकांची अडचण सोडवून धारणगाव कुंभारी येथे गोदावरी नदीवर पूल बांधला. त्यामुळे धारणगाव-कुंभारी होडी सेवा बंद झाली. 2024 ला याच कुंभारीच्या गोदावरी नदीवर जलविहार करण्यासाठी बोटीची सुविधा उपलब्ध झाली आहे. ती बोट गरजेसाठी होती आणि ही बोट जलविहारासाठी आहे, असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे (Ashutosh Kale) यांनी केले.
जनतेला डबल इंजिन सरकार हवे, महाराष्ट्रात हरियाणातील विजयाची पुनरावृत्ती होणार, चंद्रशेखर बावनकुळेंना विश्वास
कोपरगाव तालुक्यातील कुंभारी येथील संतोष मोहरे या युवकाने आपला पारंपारिक होडी चालविण्याच्या व्यवसायाला बोटिंगच्या व्यवसायात रुपांतर करून कुंभारी गावाला वळसा घालून वाहणाऱ्या गोदावरी नदी किनारी बोटिंगचा व्यवसाय सुरु करण्यासाठी आणलेल्या नवीन बोटीचे पूजन व बोटिंग व्यवसायाचा शुभारंभ राघवेश्वरानंदगिरीजी महाराज व आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.
अल्पसंख्यांक आणि दलित समाज विकासाला साथ देण्यासाठी आमदार आशुतोष काळेंच्या पाठीशी
आमदार म्हणाले की, कोपरगाव मतदार संघाला मोठा धार्मिक, ऐतिहासिक वारसा आहे. या पाच वर्षात मतदारसंघाचा झालेला विकास रस्त्यांचे निर्माण झालेले जाळे व मतदारसंघातून गेलेले तीन राष्ट्रीय महामार्ग व कोपरगाव शहराचा बहुचर्चित असलेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटल्यामुळे पर्यटन व्यवसायाला आवश्यक असणारे पोषक वातावरण कोपरगाव मतदार संघात निर्माण झाले आहे. त्यातून आर्थिक वृद्धी साधली जावू शकते, याची जाणीव झालेल्या संतोष मोहरे या युवकाने गोदावरी नदीवर जलविहार करण्यासाठी बोटीची सुविधा उपलब्ध करून दिली. त्यामुळे 2004 पूर्वीच्या होडीची आठवण नागरिकांना आल्याशिवाय राहत नाही. फरक एवढाच आहे ती बोट गरजेसाठी होती आणि ही बोट जलविहारासाठी आहे. मात्र यातून नवीन व्यवसाय शोधला हे देखील कौतुकास्पद आहे. कोपरगाव मतदारसंघाचा एकूण झालेला विकास पाहता पर्यटन व्यवसायाला चालना मिळणार असल्याचा विश्वास आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.