Ahmednagar News : बोल्हेगाव परिसरातून एक निवृत्त लष्करी जवान बेपत्ता झाले होते. त्यांचा मृतदेह लोणी परिसरात रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला आहे. विठ्ठल नारायण भोर असे निवृत्त लष्करी जवानाचे नाव आहे. दरम्यान भोर हे बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने पोलीस ठाण्यात दाखल केली होती. दरम्यान त्यांच्या शरीरावर मोठ्या जखमा असल्याचे प्राथमिक माहितीमध्ये समोर आले आहे. या घटनेनं जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. (Body of missing retired army man found in Ahmednagar shaken again)
याबाबत अधिक माहिती अशी, गणेश चौक येथे राहणाऱ्या सुरेखा भोर यांनी आपले पती निवृत्त लष्करी जवान असलेले विठ्ठल भोर हे सापडत नसल्याची तक्रार तोफखाना पोलीस स्टेशनला दाखल केली होती.
27 तारखेला दुपारी चार नंतर त्यांचा फोन लागत नसून ते घरी आले नसल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर तोफखाना पोलिसांनी त्यांना शोधण्यासाठी दोन पथके रवाना केली होती. मात्र त्यांचा मोबाईलही बंद असल्याने त्यांचा ठाव ठिकाणा समजत नव्हता रविवारी दुपारी विठ्ठल भोर यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात लोणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत लोणी तळेगाव रोडचा बाजूला गोगलगाव हद्दीत सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
पीक विमा भरण्यासाठी मुदतवाढ; रोहित पवारांच्या मागणीची अजितदादा अन् मुंडेंकडून दखल!
धक्कादायक बाब म्हणजे भोर यांच्या शरीरावर मोठ्या प्रमाणावर जखमा या आढळून आल्या. नेमका हा घातपात आहे कि अन्यकाही याबाबत अद्याप माहिती समजलेली नाही. मात्र नगर शहरात खुनाच्या व गुन्हेगारीच्या घटना या काहीकेल्या कमी होतांना दिसत नाही आहे. या घटनेनं जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे