हो, अजितदादांसमोर मी माझा मुद्दा मोठ्या आवाजात मांडला : भुजबळ

नाशिक : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापल्यानंतर सरकार आणि ओबीसी संघटनांच्या नेत्यांमध्ये काल (दि. 29) सह्याद्री अतिथीगृहात बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली होती. त्यानंर आज (दि. 30) भुजबळ यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले […]

Ajit Pawar And Chhagan Bhujbal

State President of NCP (Sharad Pawar) group Jayant Patil commented in support of Minister Chhagan Bhujbal.

नाशिक : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापल्यानंतर सरकार आणि ओबीसी संघटनांच्या नेत्यांमध्ये काल (दि. 29) सह्याद्री अतिथीगृहात बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली होती. त्यानंर आज (दि. 30) भुजबळ यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, कालच्या बैठकीदरम्यान मी माझा मुद्दा थोड्या मोठ्या आवाजात मांडला. मात्र, याचा अर्थ आमच्यात मतभेद नाही. मी बैठकीत दिलेली आकडेवारी गायकवाड आयोगाची होती. सरकारमध्ये नोकरीत घेतांना आरक्षणाचा अनुशेष आहे. त्यामुळे न्याय मिळत नसेल तर बोलावं लागेल असे स्पष्टीकरण भुजबळांनी दिले. ते पत्रकारांशी बोलत होते. (Chagan Bhujbal Clarification On Ajit Pawar Controversy )

‘मी प्रश्न विचारला अन् शिंदे-नार्वेकरांचे दौरेच रद्द; डर अच्छा है!’ आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

नोकरीत अनुशेष दिसतोय, हे मी सांगत असतांना अजित पवारांनी सेक्रेटरींना विचारलं, त्यांनी सांगितलं अशी काही माहिती नसल्याचे सांगितले. ही माहिती नसल्याचे तसेच ती सत्य नसल्याचे म्हटल्यानंतर मी तुमच्याकडे माहिती नाही, असं होऊ शकत नाही असे उत्स्फूर्तपणे बोललो. यावेळी आमच्यात थोडीसी शाब्दीक चकामक झाली. मात्र, झालेल्या गोष्टीचा पराचा कावळा करण्यात आला. आमच्यात मतभेद नाही, मी माझा मुद्दा थोड्या मोठ्या आवाजात मांडला एवढंच असे भुजबळ म्हणाले. एका घरात दोन भावांच्या अशा चर्चा होत असतात असे म्हणत खिंडार, अंतर्गत लढाई असं काही नसून, तो मुद्दा तिथे संपलेला असल्याचे यावेळी भुजबळांनी यावेळी स्पष्ट केले.

घड्याळ चिन्ह आम्हालाच मिळणार

राष्ट्रवादीतील फुटीनंतर पक्षाचं नाव आणि चिन्ह नेमकं कुणाला मिळणार याचा वाद सुरू आहे. यावर भुजबळांनी घड्याळ चिन्हं गोठवल जाणार याची माहिती नसल्याचे सांगितले. एवढेच नव्हे तर, जयंत पाटीलदेखील म्हणाले, की आमचा पक्ष फुटलेला नाही. फक्त पक्षांतर्गत अध्यक्ष आणि इतर निवडणुका असतात. त्यामुळे आमची खात्री आहे पक्षाचं चिन्हं आणि सर्व गोष्टी आमच्याकडे राहतील.

पैसे घेऊन 28 लाख लोकांना OBC प्रमाणपत्र; वडेट्टीवारांच्या आरोपाने खळबळ !

…म्हणून आजितदादा वर्षावर दर्शनासाठी गेले नाही

नुकत्याच झालेल्या गणपती उत्सवादरम्यान बॉलीवूडपासून ते अनेक नेत्यांपर्यंत सर्वांनी मुख्यमंत्र्यांच्या सरकारी निवास्थानी भेट देत गणपती बाप्पांचे दर्शन घेतले. मात्र, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार वर्षा बंगल्यावर दर्शनासाठी गेले नव्हते. अजितदादांनी वर्षावर न जाण्याने महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याच्या चर्चांना ऊत आला आहे. मात्र, ज्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी दादांना दर्शनासाठी बोलावले होते. त्यादिवशी अजितदादा प्रचंड व्यस्त होते. शिंदेंनी संध्याकाळी साडेसहा वाजेचं निमंत्रण दिलं होत. मात्र, अन्य कार्यक्रमांमध्येच अजितदादांना उशिर झाल्याने ते दर्शनासाठी गेले नसतील अशी सारवासावर करत यातून काही वेगळा अर्थ काढण्याची गरज नसल्याचे भुजबळांनी यावेळी सांगितले.

Exit mobile version