Download App

कॉलेजचे प्रेम पुन्हा फुललं ! पत्नीचा घात केला अन् दीड तास पाहत राहिला

Dhule love and crime story : कॉलेजमधील जुनं प्रेम पुन्हा फुलण्यास सुरू झाले. त्यातून लष्करात नोकरीला असलेला पती पत्नीला विषारी औषधाचे इंजेक्शन देऊ मारण्याचा प्लॅन करतो.

  • Written By: Last Updated:

Dhule love and crime story : दोघांचं लग्न झालं. मुलं मोठी झाली. दोन कुटुंबाचा सुखी संसार सुरु होता. मात्र कॉलेजमधलं जुनं प्रेम पुन्हा फुलायला सुरुवात झाली. अन् त्यातून लष्करात नोकरीला असलेला पती पत्नीला विषारी औषधाचं इंजेक्शन देऊन मारण्याचा प्लॅन करतो. हा प्लॅन यशस्वी होतो. मात्र पुढं अत्यंविधीच्या वेळी हा सगळा प्लॅन उघडकीस येतो. ही स्टोरी एखाद्या हिंदी, मराठी चित्रपट किंवा मालिकेची नाही तर आपल्या धुळ्यातली आहे, नेमकं काय घडलं होतं? कॉलेजमधलं जुनं प्रेम पुन्हा कसं बहरलं? सविस्तर पाहूयात/

‘सैयारा’ माझ्या पाच वर्षांतील संकलित गाणी, विचार आणि सूर आहेत!’ : मोहित सूरी

धुळ्यातील रहिवासी अन् भारतीय सैन्यात क्लर्क असलेल्या कपिल बागुलाचा 2010 मध्ये शारदा व उर्फ पूजा हिच्याशी विवाह झाला. तीही बीएसस्सी बीएड झालेली. त्याची सासरवाडी जळगावमधील धडगावची. दोघांचा सुखी संसार सुरू होता. नऊ वर्षांची मुलगी आणि सात वर्षांचा मुलगाही आहे. कपिल धुळ्यातील जयहिंद महाविद्यालयातून बीए झालेले. त्याचे प्रज्ञा या तरुणीशी प्रेमसंबंध होते. मात्र 2007 मध्ये तिचा विवाह झाला. ती त्याच शहरात राहत होती. तिला 17 आणि 13 वर्षांच्या मुली आहेत. अनेक वर्षे ते एकमेंकाना भेटले नव्हते. दोघांचा संसार सुरुळीत सुरू होता. मात्र कौटुंबिक वादातून प्रज्ञा हिचा संसार मोडण्याच्या उंबरठ्यावर होता. तीही बीएस्सी, एमबीए झालेली. तिच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू होती. त्याचवेळी कपिल आणि प्रज्ञा हे दोघंही भेटले आणि त्यांचे जुने प्रेमसंबंध पुन्हा सुरू झाले. पण हे प्रेमप्रकरणा नाहीतर अनैतिक संबंध होते. कपिल हा आपल्या जुन्या प्रेमप्रकरणात पुन्हा गुरफटला. आपल्याला पत्नी, दोन मुलं आहेत हे तो विसरून गेला. दोघंही लॉजवर भेटत होते. पूजाला हे समजल्यावर कपिलला ती विरोध करत.

छताचा पंखा, 71 किलो वजन अन् साडी; वैष्णवी हगवणे प्रकरणात खळबळजनक ट्विस्ट, फॉरेन्सिक तपासातून…

पण कपिल हा ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. तो तिला विरोध करत. पूजानं हे माहेरी सांगितलं. पूजाच्या भावानं महिला आयोगाकडं तक्रार केली. पण काही दिवसानं ही तक्रारी मागं घेण्यात आली. पूजाचा अनैतिक संबंधाला विरोध होत असल्यानं कपिल अन् त्याच्या प्रेयसीनं मिळून तिचा काटा काढण्याचा प्लॅन आखला. कपिलनं पूजाला पेस्टिसाइडचे तीन ते चार इंजेक्शन दिले. तीच्या तोंडातून फेस येऊपर्यंत तो तिच्यासमोर बसलेला होता. तेही तब्बल दीड तास. म्हणजे पत्नीचा तो दीड तास आपल्या डोळ्यानं मृत्यू पाहत होता. पूजाचा मृत्यू झाल्यानंतर तिला त्यानं एका खासगी हॉस्पिटलमध्ये नेलं. त्यांनी सरकारी हॉस्पिटलमध्ये नेण्यास सांगितलं. पण आपलं भिंग फुटेल म्हणून कपिलनं इतरांच्या मदतीनं अंत्यविधीची तयारी सुरु केली.

पूजाचा भाऊ भूषण महाजनला फोन करून पूजाचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. पूजाचा भाऊ आणि इतर नातेवाइक धुळ्यात आले. तोपर्यंत देवपूर पश्चिमच्या पोलिस ठाण्याला मृत्यूप्रकरणाची माहिती मिळाली होती. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी नेलं. त्यावेळी तिचं शरीर काळं-निळं पडलं होतं. तिचा मृत्यू विषारी औषधानं झाल्याचं समोर आलं. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. केवळ पतीच नाही तर सासू विजया बागूल, नणंद हीचाही यात हात असल्याचं चौकशीत उघडकीस आलं. या तिघांनी तिला पकडून तिच्या हातावर पाय ठेवून तिला इंजेक्शन दिल्याचं उघडकीस आलं. या तिघांना अटक केल्यानंतर प्रेयसीला जेरबंद करण्यात आलंय. जुन्या प्रेमामुळं दोन कुटुंबातील मुलं आता उघड्यावर पडले आहेत, एवढं मात्र नक्की.

follow us