Download App

अजितदादांच्या बंडाने नगर शहरातील भाजपची राजकीय गणितं बिघडली… पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम

Ahmednagar Political News : सध्या राज्याच्या राजकारणात नव नव्या घडामोडी घडत आहे. यामुळे आता पक्षातील नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये देखील संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. नव्या समीकरणांमुळे राष्ट्रवादी-सेना-भाजप हे सरकार सध्या राज्यात अस्तित्वात आहे. मात्र यामुळे आता आगामी विधानसभेसाठी अहमदनगरमधील जागा राष्ट्रवादीसाठी सोडावी लागणार की काय? यामुळे भाजपामध्ये अस्वस्था निर्माण झाली आहे. ( Confusion in Ahmednagar Political circle due to Ajit Pawar enter in Power )

सासरेबुवांनी धरली अजितदादांची वाट, तर जावयांचे पत्ते अद्याप गुलदस्त्यात…

दरम्यान भारतीय जनता पार्टीने दूरदृष्टीने हे निर्णय घेतले आहेत. राज्यातील राजकीय घडामोडींनी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी विचलित होवू नये. खचून न जाता एकनिष्ठेने पक्षाचे कामे चालूच ठेवा. कितीही राजकीय उलथापालथी झाल्या तरी नगरचा लोकप्रतिनिधी हा ओरिजिनल भारतीय जनता पार्टीचाच होईल, असे प्रतिपादन भाजपाचे शहर जिल्हाअध्यक्ष महेंद्र गंधे यांनी केले.

दिलीप वळसेंबद्दल सांगताना साहेबांचे डोळे पाणावले होते, जितेंद्र आव्हाडांचा गौप्यस्फोट

नव्या समीकरणामुळे ‘ती’ जागा राष्ट्रवादीसाठी…
नुकतेच राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी घटना घडली आहे. अजित पायावर यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांनासोबत घेऊन शिंदे – फडणवीस सरकारशी हात मिळवणी करत सत्तेत सहभागी झाले आहे. या नव्या राजकीय समीकरणामुळे अनेक ठिकाणी सेने – भाजपची गणित बिघडली असल्याचे दिसते. असाच काहीसा तक्रार आता नगर शहरात देखील निर्माण झाला आहे.

राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप हे अजित पवार गटात सहभागी झालेत. यामुळे आगामी निवडणुकीत भाजप-सेना-राष्ट्रवादीकडून ही जागा राष्ट्रवादीसाठी सोडण्याची वेळ आली तर… या शक्यतेने शहरातील भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष आणि विधानसभा मतदारसंघ प्रमुख महेंद्र गंधे यांनी कार्यकर्त्यांना खचून न जाण्याचं आवाहन केले आहे. काहीही झाले तर उमेदवार मूळ भाजपचा असेल, अशी ग्वाही गंधे यांनी दिली आहे.

शहर भाजपच्या वतीने शहर जिल्हाअध्यक्ष महेंद्र गंधे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामदैवत विशाल गणपती मंदिरात त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी महेंद्र गंधे बोलत होते. यावेळी भाजपचे अभय आगरकर म्हणाले, भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी पक्षाचे व देशाचे हित पाहूनच योग्यच निर्णय घेतले असतील. प्रत्येक पक्षात संक्रमण काल येतोच. त्यामुळे कार्यकर्त्यांनी गोंधळून जाऊ नये.

Tags

follow us