दिलीप वळसेंबद्दल सांगताना साहेबांचे डोळे पाणावले होते, जितेंद्र आव्हाडांचा गौप्यस्फोट

दिलीप वळसेंबद्दल सांगताना साहेबांचे डोळे पाणावले होते, जितेंद्र आव्हाडांचा गौप्यस्फोट

दिलीप वळसे पाटीलही म्हणत होते, मला जायचंय असं जेव्हा शरद पवारांनी मला सांगितलं तेव्हा त्यांचे डोळ पाणावले होते, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं आहे. एका मुलाखतीदरम्यान बोलताना आव्हाड यांनी भाष्य केलं आहे. ज्या पोराने लाडावलेल्या बाळासारखं खेळवलं त्याने असं करावं का? जो लाडका विद्यार्थी होता, दिलीप म्हटलं तर साहेब सर्व काही बाजूला ठेवत होते, शरद पवारांना नियतीने यापेक्षा आणखी किती मोठा त्रास द्यावा, असंही जितेंद्र आव्हाडांनी म्हटलंय.

शिर्डी येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय सुरु करण्यास मान्यता, मंत्री विखे पाटलांची माहिती…

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवारांनी मला सांगितलं की, दिलीपही मला सांगून गेलायं की मला जायचंय, त्यावेळी शरद पवारांचे डोळे पाणावले होते, आत्तापर्यंत शरद पवारांच्या डोळ्यात फार कमी लोकांनी पाहिले आहेत. याआधी सांगलीच्या माझं भाषण सुरु असतानाच शरद पवारांना अश्रूंचा हुंदका आला होता, पण शरद पवारांनी त्या हुंदक्यालाही आतमध्ये खेचलं होतं, मात्र, जेव्हा दिलीप वळसेंबद्दल शरद पवार सांगत होते तेव्हा त्यांचे अश्रू तरवळल्याचे दिसत असल्याचं जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं आहे.

मुश्रीफांना मंत्रिपद दिल्याने समरजित घाटगेंची मोठी कोंडी; उद्या भूमिका स्पष्ट करणार

माणूस इतका कसा निष्ठूर असू शकतो, या शब्दांत आव्हाडांनी दिलीप वळसेंच्या भूमिकेवर टीका केली आहे. एकवेळेस घरातील कुत्रा गेल्यानंतर माणूस चार दिवस जेवत नसतो, तो कुत्रा बोलत नाही, पण सहवास नावाची काही गोष्ट आहे की नाही? असा सवाल करीत वळसेंवर आव्हाडांनी भाष्य केलंय. तसेच प्रेम, स्वभावांच्या काही व्याख्या आहेत की नाही. सत्ता हीच जर व्याख्या असेल तर माणुसकीचा अंतच झालाय, असंच म्हणावं लागणार असल्याचं आव्हाडांनी दिलीप वळसे पाटलांवर टीका केलीय.

अजित पवारांना मोठा धक्का; उजवा हात समजल्या जाणाऱ्या अशोक पवारांनी सोडली साथ

दरम्यान, राष्ट्रवादीच्या फुटीनंतर राष्ट्रवादीत दोन गट पडल्याचे स्पष्ट झालं आहे. एक शरद पवार गट तर दुसरा अजित पवार गट पडला आहे. अजित पवारांनी आपल्या समर्थकांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल होण्याचा निर्णय घेतल्याने शरद पवारांनी त्यांच्या या भूमिकेला विरोध केला आहे. एवढंच नाहीतर दोन्ही गटांमध्ये पदाधिकाऱी, नेत्यांना खेचण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरु असल्याचं पाहायला मिळालंय. अजित पवारांसोबत शपथविधीला असलेले काही आमदार, खासदारांनी पुन्हा माघारी फिरत शरद पवारांचंच नेतृत्व मान्य केल आहे.

दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांची काल मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या नेत्यांमध्ये टीका-टीपण्यांचे सत्र सुरु असल्याचं पाहायला मिळालंय. त्यानंतर आता जितेंद्र आव्हाडांनी मोठा गोप्यस्फोट केला आहे. दिलीप वळसे पाटलांबद्दल सांगितल्यानंतर आता वळसे पाटील यावर काय बोलणार? याकडे सर्वांच लक्ष लागलंय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube