मुश्रीफांना मंत्रिपद दिल्याने समरजित घाटगेंची मोठी कोंडी; उद्या भूमिका स्पष्ट करणार

मुश्रीफांना मंत्रिपद दिल्याने समरजित घाटगेंची मोठी कोंडी; उद्या भूमिका स्पष्ट करणार

Samarjit Ghatake on Hasan Mushrif : अजित पवार गट सत्तेत आल्याने शिंदे गटामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. एकाकडे ज्या प्रमाणे अजित पवारांच्या एन्ट्रीने शिवसेनेचे आमदार नाराज आहेत. त्याच प्रमाणे भाजपमध्ये देखील स्थानिक पातळीवर या युतीने नाराजीचा सूर दिसून येत आहे. त्यामध्ये आता कोल्हापुरातील कागलमध्ये भाजपच्या समरजित घाटगे यांची मोठी कोंडी झाली आहे. कारण त्यांचे कट्टर विरोधक असलेल्या हसन मुश्रीफांना या मंत्रिमंडळामध्ये थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळालं आहे. ( Clashesh Between Samarjit Ghatage and Hasan Mushrif After got cabinate miniter post in Ajit Pawars MLA )

राष्ट्रवादी 90 तर भाजप 150 जागा लढविणार, अजितदादा मुख्यमंत्रीपदी; शिंदेंच्या वाट्याला काय?

काय आहे समरजित घाटगे आणि हसन मुश्रिफांचा वाद?

कागल मतदारसंघामध्ये हसन मुश्रीफ हे 1999 पासून सलग पाच वेळा राष्ट्रवादीकडून निवडून आले आहेत. मात्र 2019 ला शाहू ग्रुपचे प्रमुख आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी चांगलंच आव्हान निर्माण केलं होतं. सेना भाजपची युती असताना देखील फडणवीसांच्या पाठिंब्याने घाटगेंनी बंडखोरी करून हे आव्हान निर्माण केलं होतं.

म्हणाले होते…काकाच प्रमुख राहणार, आता अजितदादांनीच पवारांची अध्यक्षपदावरून केली ‘हकालपट्टी’

त्यानंतर देखील भाजप नेते किरीट सोमय्यांनी मुश्रीफांवर विविध गैरव्यहारांचे आरोप केले त्यावेळी समरजित घाटगे यांनी देखील मुश्रीफांवर विविध आरोप करत त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्यांच्या घर आणि संबंधितांच्या कारखान्यावर ईडीने छापेमारी केली होती. त्यांनी ईडीने रडारवर घेतले होते.

आता मात्र याच समरजित घाटगेंच्या कट्टर विरोधकाला फडणवीसांनी मंत्रिमंडळामध्ये थेट कॅबिनेट मंत्रीपद दिलं आहे. त्यामुळे आता समरजित घाटगेंची भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यासंदर्भात स्वतः समरजित घाटगेंनी एक व्हिडीओ पोस्ट करत आपण या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे ते उद्या काय भूमिका घेणार आहेत. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube