अजित पवारांना मोठा धक्का; उजवा हात समजल्या जाणाऱ्या अशोक पवारांनी सोडली साथ

अजित पवारांना मोठा धक्का; उजवा हात समजल्या जाणाऱ्या अशोक पवारांनी सोडली साथ

NCP : मुंबई : शिरुर मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार (Ashok Pawar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची साथ सोडून राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. अशोक पवार हे अजित पवार यांचा उजवा हात समजले जात होते. रविवारी (2 जुलै) अजित पवार यांचा शपथविधी पार पडला तेव्हा अशोक पवार राजभवनात उपस्थित होते. मात्र आज ते आधी सिल्वर ओक आणि नंतर यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार यांच्या बैठकीला उपस्थित आहेत.

अशोक पवार यांची साथ सोडणं हा अजित पवार यांना मोठा धक्का मानला जात आहे. यावेळी बोलताना अशोक पवार म्हणाले, शपथविधीवेळी आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून बोलावलं होतं. त्यामुळे आम्ही गेलो होतो. त्यावेळी आमच्या सह्या घेतल्या, पण आम्ही ते वाचलं नव्हतं. खोटं बोलून आमच्याकडून सह्या घेतल्या असा गौप्यस्फोट करत आपण शरद पवार यांच्याचसोबत असल्याचं अशोक पवार यांनी स्पष्ट केलं. (NCP MLA Ashok Pawar left Ajit Pawar and Support to NCP Chief Ajit Pawar)

प्रफुल्ल पटेल पवार साहेबांची सावली, अजितदादांना पाठिंबा दिलाय, इशारा समजून घ्या!

पुण्यात अजित पवार विरुद्ध शरद पवार 50-50

पुणे जिल्ह्यात अजित पवार विरुद्ध शरद पवार यांच्यात 50-50 असे संख्याबळ असल्याचं पाहायला मिळत आहे. पुणे जिल्ह्यातील दोन्ही खासदार शरद पवार यांच्यासोबत आहेत. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शिरुरचे खासदार अमोल कोल्हे हे शरद पवार यांच्यासोबत आहेत. तर हडपसरचे आमदार चेतन तुपे हेही पवार यांच्यासोबत आहेत. याशिवाय पुणे शहर आणि ग्रामीणचे राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुतांश पदाधिकारी शरद पवार यांच्यासोबत असल्याचे दिसून येत आहेत.

‘तो’ प्रश्न मनात आला अन् आज साहेबांसोबत ठाम, अमोल कोल्हेंनी ठणकावून सांगितलं…

तर इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे, वडगाव शेरीचे सुनील टिंगरे, पिंपरीचे अण्णा बनसोडे, मावळचे सुनिल शेळके, वडगाव शेरीचे सुनिल टिंगरे, आंबेगावचे दिलीप वळसे पाटील, जुन्नरचे अतुल बेणके, खेडचे दिलीप मोहिते हे आमदार अजित पवार यांच्यासोबत आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील 11 पैकी 9 म्हणजे बहुतांश आमदार हे अजित पवार यांच्यासोबत असल्याचे दिसून येत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube