Ahemadnagar News : सासरेबुवांनी धरली अजितदादांची वाट, तर जावयांचे पत्ते अद्याप गुलदस्त्यात…

Ahemadnagar News : सासरेबुवांनी धरली अजितदादांची वाट, तर जावयांचे पत्ते अद्याप गुलदस्त्यात…

सध्या राज्यात सुरु असेलल्या राजकीय गोंधळात अखेर राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी अजित पवार यांची वाट धरली आहे. घुले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी भेट घेत पाठिंबा दिली आहे. तर घुलेंचेच जावई आणि राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. दरम्यान, राष्ट्रवादीच्या बंडानंतर राष्ट्रवादीमध्ये आमदारांची रस्सीखेच सुरु असल्याचं दिसून आलं होतं. अशातच आता चंद्रशेखर घुले यांनी अजितदादांसोबत राहण्याचा निर्णय घेतलाय. तर घुले यांचे जावई राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांनी आपले पत्ते अद्याप उघड केलेल नाहीत. त्यामुळे आता सासरेबुवांनी अजितदादांची वाट धरल्याने जावई कोणाची वाट धरणार? याची उत्सुकता अनेकांना लागलायं.

गडकरींचा दावा, पेट्रोल होणार 15 रुपये प्रतिलिटर, शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इथेनॉलवर चालणार गाड्या

चंद्रशेखर घुले हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत. नगर जिल्हा सहकारी बँकेतील अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत त्यांचा केवळ एका मताने पराभव झाला होता. त्यामुळे ते नाराज होते. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट निर्माण झाले आहेत. सध्याचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गटात आहेत. तर चंद्रशेखर घुले यांनी आज अजित पवार यांना भेटल्याने त्यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर काल राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाची बैठक पार पडली. अजित पवार गटाची मुंबईतील एमआईटी इन्स्टिट्युटमध्ये तर शरद पवार गटाची वाय. बी. सेंटरमध्ये बैठक पार पडली.

या बैठकीत उपस्थित राहुन अनेक नेत्यांनी आपल्या गटाचा नेता निवडला असल्याचं दिसून आलं. अजित पवारांनी देवगिरी निवासस्थानावर आमदारांची बैठक घेतल्यानंतर थेट राजभवन गाठत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधीनंतर राज्यात मोठा भूकंपच झाला. तर दुसरीकडे शरद पवारांच्या भूमिकेनंतर राष्ट्रवादीत दरी पडल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यानंतर दोन्ही गटांकडून आमदारांवर अपात्रतेच्या कारवाईची मागणी करण्यात आल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर दोन्ही गटाने आपल्या प्रदेशाध्यक्षाचीही घोषणा केली.

Shraddha Kapoor सोबतचा ‘तो’ व्यक्ती कोण? अभिनेत्री नेमकं कोणाला करतेय डेट? जाणून घ्या…

दरम्यान, अजित पवारांच्या शपथविधीनंतर ‘देवगिरी’ निवासस्थानी अनेक नेत्यांनी हजेरी लावत पाठिंबा दर्शवला होता. अजित पवार गटामध्ये राष्ट्रवादीचे दिग्गज नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील. सुनिल तटकरे, धनंजय मुंडे, नरहरी झिरवळ, अमोल मिटकरींनी पाठिंबा दिलायं. तर दुसरीकडे शरद पवारांसोबत जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, अनिल देशमुख, अमोल कोल्हे, यांच्यासह इतर नेते ढाल बनून ठामपणे उभे आहेत. या संपूर्ण घडामोडी सुरु असताना काही कार्यकर्त्यांची भूमिका अस्पष्ट होती.

53 आमदारांनी भाजपसोबत जाण्यासाठी पत्र लिहिले पण मलाच का व्हिलन केलं?

यामध्ये अकोले मतदारासंघाचे आमदार किरण लहामटे यांनी आपली भूमिका स्पष्ट करीत शरद पवारांच्या मागे उभं असल्याचं ठामपणे सांगितलं. तर शेवगाव मतदारसंघाचे माजी आमदार चंद्रशेखर घुलेंनी अजित पवारांच्या निवासस्थानी भेट देत अजितदादांना पाठिंबा दिला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या बैठकीनंतर दोन्ही गटाकडून आमदारांना व्हीप बजावण्यात आलाय. शरद पवारा गटाकडून जितेंद्र आव्हाड तर अजित पवार गटाचे अनिल पाटील यांची प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आलीय.

दरम्यान, 2009 साली चंद्रशेखर घुले पहिल्यांदाच राष्ट्रवादीकडून विधानसभेवर निवडून गेले, त्यानंतर 2014 च्या निवडणुकीत घुले यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. 2014 साली भाजपकडून मोनिका राजळे यांनी चंद्रशेखर घुलेंचा पराभव केला होता. त्यानंतर 2019 साली शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रताप ढाकणे यांनी उमेदवारी देत चंद्रशेखर घुलेंना डावलण्यात आलं होतं. त्यानंतर घुले यांची जिल्हा बॅंकेवर निवड झाली होती, मात्र या निवडणुकीतही भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी घुलेंचा पराभव केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube