Download App

श्रीरामपुरात काँग्रेसला धक्का! माजी नगराध्यक्षांसह 10 जणांच्या हाती कमळ; विखेंची खेळी यशस्वी

काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीरामपुरातील माजी नगराध्यक्षांसही दिग्गज स्थानिक नेत्यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला.

Ahilyanagar Politics : अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपुरात काल काँग्रेसला (Congress Party) मोठा धक्का बसला. काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीरामपुरातील माजी नगराध्यक्षांसही दिग्गज स्थानिक नेत्यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश मुंबईत पार पडला. या राजकारणाचा श्रीरामपुरातील काँग्रेसच्या करण ससाणे गटाला मोठा धक्का बसला आहे. श्रीरामपूर मतदारसंघात काँग्रेसचे हेमंत ओगले आमदार आहेत. येथे काँग्रेसची ताकद आहे. परंतु, राधाकृष्ण विखे यांनी मोठी खेळी करत काँँग्रेसच्या या बालेकिल्ल्याला खिंडार पाडलं आहे.

जिल्हा विभाजनावर न बोलणे चांगले ! श्रीरामपूर जिल्हा निर्मितीच्या मागणीची हवा थोरातांनीच काढली !

विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळाले व येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहे. यामुळे आता भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू आहे. नुकतेच मंत्री राधाकृष्ण विखे यांनी आपले राजकीय विरोधक बाळासाहेब थोरात यांना मोठा धक्का दिला आहे. कर्जतपाठोपाठ श्रीरामपूर येथील काँग्रेसच्या अनेक माजी नगरसेवकांनी काँग्रेसला रामराम केला आहे. भाजपला साथ देत मंत्री विखेंच्या उपस्थित झालेल्या या पक्ष प्रवेशामुळे थोरातांना मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.

काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या श्रीरामपूर मतदारसंघात काँग्रेसला खिंडार पडले असून माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षसह काँग्रेसच्या नगरसेवकांनी काँग्रेसचा हात सोडत भाजपचा कमळ हाती घेतले आहे. त्यामुळे बाळासाहेब थोरात यांचे निकटवर्ती काँग्रेसचे विद्यमान आमदार हेमंत ओगले आणि काँग्रेस नेते करण ससाणे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

श्रीरामपूरचे माजी नगराध्यक्ष संजय फंड, माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास बिहाणी, माजी नगरसेवक अशिष धनवटे, शशांक रासकर यांच्यासह 10 माजी नगरसेवकांनी १५ एप्रिल रोजी मुंबई येथे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत भाजपात जाहीर प्रवेश केला.

जिल्ह्यात विखेच ठरतायत किंगमेकर

येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुका होणार आहेत. जिल्ह्यात विधानसभेत महायुतीला यश मिळवून देण्यात खारीचा वाटा उचलणाऱ्या विखे पिता पुत्रांनी आता आगामी काळातील निवडणुका डोळ्यांसमोर ठेवत राजकीय डावपेच टाकण्यास सुरुवात केली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात भाजपाची ताकद अधिक वाढविण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी जोरदार ‘बॅटींग’ सुरु केली आहे. श्रीरामपुरातील काँग्रेसचा एक मोठा गट फोडण्यात विखेंना यश आले आहे.

या दहा जणांचा भाजपात प्रवेश

नगराध्यक्ष संजय फंड, माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास बिहाणी, माजी नगरसेवक अशिष धनवटे, शशांक रासकर, शामलिंग शिंदे, कैलास दुबय्या, मनोज लबडे, राजेंद्र आदिक, संजय गांगड, सोमनाथ गांगड यांचा समावेश आहे.

follow us