जिल्हा विभाजनावर न बोलणे चांगले ! श्रीरामपूर जिल्हा निर्मितीच्या मागणीची हवा थोरातांनीच काढली !

  • Written By: Published:
जिल्हा विभाजनावर न बोलणे चांगले ! श्रीरामपूर जिल्हा निर्मितीच्या मागणीची हवा थोरातांनीच काढली !

अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करण्याच्या मागणीने पुन्हा एकदा जोर धरला आहे. जिल्हा विभाजनावर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे वेगवेगळे मते आहेत. महसूलमंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे, खासदार सुजय विखे हे जिल्हा विभाजनाच्या विरोधात आहेत. तर आमदार राम शिंदे हे जिल्हा विभाजनाच्या बाजूने आहेत. श्रीरामपूर (Shrirampur) जिल्हा होण्यासाठी काँग्रेसचे करण ससाणे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय आंदोलन आजपासून श्रीरामपूरमध्ये सुरू झाले आहे. त्यात आता माजी महसूलमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी एक मोठे विधान केले आहे. या विधानामुळे श्रीरामपूर जिल्हा निर्मिती मागणीची हवाच निघून गेली आहे. (balasaheb thorat speak on shrirampur district-formation)

केसीआर यांच्याकडून मला CM पदाची ऑफर; राजू शेट्टींचा मोठा दावा

थोरात म्हणाले, मी महसूलमंत्री असताना पालघर जिल्ह्याचे विभाजन केले होते. त्याचवेळी सरकारचा एक निर्णय झाला होता की पुन्हा नव्याने जिल्ह्याची निर्मिती करू नये. कारण नवीन जिल्हा निर्माण करण्यासाठी 56 वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यालयांची निर्मिती करावी लागते. तेवढे अधिकारी व कर्मचारी नेमावे लागतात तशी व्यवस्था अजूनपर्यंत आपण निर्माण करू शकलो नाही, असे थोरात म्हणाले. मागील सरकारचे धोरण हे याच सरकारने लागू केलेले असल्याचे दिसत असल्याचे थोरातांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे जिल्हा विभाजनावर न बोलणे चांगले, असे सांगण्यास थोरात विसरले आहे. त्यामुळे जिल्हा विभाजनाच्या मुद्द्यावर तरी थोरात व राधाकृष्ण विखे यांचे एकमत असल्याचे दिसून येत आहे.

मध्य प्रदेशात कमल की कमलनाथचे सरकार? सर्वेत आश्चर्यकारक आकडेसमोर

काही दिवसांपूर्वी शिर्डीला अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाला मंजुरी मिळाली आहे. त्यावरून जिल्हा विभाजनाचा मुद्दा पुन्हा पुढे आला. तर श्रीरामपूरमधील सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी जिल्हा विभाजन करून श्रीरामपूर मुख्यालय करावे, यासाठी मागेही आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनावरून विखेंनी श्रीरामपूरमधील नेत्यांना चांगलेच सुनावले होते. आता तर थोरात यांनी जिल्हा विभाजनाच्या मागणीची हवाच काढली आहे. त्यामुळे आता थोरातांविरोधात श्रीरामपूरमध्ये नाराजी पसरण्याची शक्यता आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube