मध्य प्रदेशात कमल की कमलनाथचे सरकार? सर्वेत आश्चर्यकारक आकडेसमोर
मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीसाठी फारच कमी वेळ शिल्लक आहे. अशा परिस्थितीत भाजप आणि काँग्रेस आपापल्या परीने विजयाचे दावे करत आहेत. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान असोत वा माजी मुख्यमंत्री कमलनाथ, दोघेही यावेळी मध्य प्रदेशात सरकार स्थापनेसाठी प्रयत्नशील आहेत, पण त्याबाबत जनतेचे मत काय आहे आणि जनतेचे मत हे सर्वात महत्त्वाचे आहे. आणि हे मत जाणून घेण्यासाठी सी-व्होटरने सर्वेक्षण केले आहे, ज्यामध्ये यावेळी विधानसभेच्या निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळतात आणि दोन्ही पक्षांचे मताधिक्य किती आहे हे समोर आले आहे. (abp-cvoter-survey-who-will-get-more-seats-in-madhya-pradesh-elections-bjp-or-congress)
मध्य प्रदेश निवडणुकीच्या पहिल्या ओपिनियन पोलमध्ये राज्यातील 17 हजारांहून अधिक लोकांना प्रश्न विचारण्यात आला होता की, यावेळी भाजप आणि काँग्रेसमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील. याबाबत जनतेकडून मिळालेला प्रतिसाद आश्चर्यकारक आहे. यावेळी मध्य प्रदेशात कोणाचे सरकार बनणार, भाजप की काँग्रेस, हे जनतेने सांगितले आहे. चला तर मग जाणून घेऊया यावेळच्या सर्वेक्षणात मध्य प्रदेशातील जनतेचा मूड काय आहे.
मध्य प्रदेशात मतांची टक्केवारी
भाजप-44%
काँग्रेस-44%
BSP-2%
इतर – 10%
PM मोदींनी ज्यांचा उल्लेख केला, ते पसमांदा मुस्लिम आहेत तरी कोण? त्यांचा इतिहास काय?
मध्य प्रदेशात एकूण जागा – 230
भाजपा-106-118
INC-108-120
बसपा-0-4
इतर-0-4
या सर्व्हेवरून असे लक्षात येते की मध्य प्रदेशात सत्ता पालट होईल. भाजपची सत्ता जाऊन काँग्रेची सत्ता येईल. जाई असे झाले तर कर्नाटकनंतर भाजपसाठी हा मोठा धक्का असेल.