Download App

नृत्यांगना गौतमी पाटीलचे वडील सापडले बेवारस अवस्थेत, रुग्णालयात उपचार सुरू

Gautami Patil : आपल्या नृत्याने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारी नृत्यांगना गौतमी पाटीलचे वडील धुळ्यात बेवारस आणि खंगलेल्या अवस्थेत आढळून आले. स्वराज्य फाऊंडेशन या एनजीओ संस्थेने त्यांना हिरे वैद्यकीय महाविद्यालच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले आहे. पण दाखल केलेला व्यक्ती कोण आहे हे त्यांना माहित नव्हते. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यामातून मेसेज व्हायरल केले होते. काही दिवसांत दाखल केलेल्या व्यक्तीकडील आधार कार्डची ओळख पटली.

स्वराज्य फाऊंडेशनचे दुर्गेश चव्हाण हे त्यांच्या एनजीओच्या माध्यमातून बेवारस व्यक्तींना आधार देण्याचे काम करतात. चव्हाण यांनी गुरुवारी सुरत बायपास हायवे येथून गौतमी पाटील हिच्या वडिलांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. त्यानंतर त्यांच्या खिशातील आधारकार्डच्या आधारे त्या व्यक्तीचे नाव रविंद्र बाबुराव पाटील रा. वेळोदे ता. चोपडा असल्याचे कळले. व्यक्तीशी संबंधितांनी संपर्क साधावा यासाठी चव्हाण यांनी सोशल मीडियावर मेसेज व्हायरल केले. त्यानंतर रविंद्र यांच्याबद्दलची माहिती समोर आली आणि ते गौतमी पाटीलचे वडील आहेत ही बाब समजली.

One Nation One Election साठी मोदी सरकारकडून समिती स्थापन, रामनाथ कोविंद यांच्यासह ‘या’ नेत्यांचा समावेश?

रविंद्र पाटील यांची भावजय शोभा आनंद नेरपगार (पाटील) या त्यांच्या मुलीसह हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात पोहचल्या. रविंद्र पाटील हे प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिजे वडील असल्याचे शोभा नेरपगार यांनी सांगितले. रविंद्र पाटील यांची पत्नी आणि मुलगी गौतमी ह्या दोघी गेल्या पंधरा वर्षापासून पुण्यात राहत असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

बेवारस म्हणून दाखल केलेले रविंद्र पाटील यांची मुलगी गौतमी पाटील असल्याची माहिती खुद्द दुर्गेश चव्हाण यांनाही नव्हती. परंतु सोशल मिडिावर मेसेज व्हायरल केल्यानंतर त्यांना शंभराहून अधिक फोन रविंद्र पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस करणारे आले, अशी माहिती दुर्गेश चव्हाण यांनी दिली.

Sharad Pawar : मराठा समाजाला आरक्षण कसं देता येईल?; पवारांनी सांगितलं मास्टर प्लानिंग

रविंद्र पाटील हे त्यांच्या पत्नीपासून आणि मुलीपासून मागच्या पंधरा वर्षापासून विभक्त झाले आहेत. गौतमी पाटील शिंदखेड्यात मामांकडे वाढली. आठवीपर्यंतच्या शिक्षणानंतर तिने पुणे गाठलं. तेव्हापासून तिचा नृत्याचा प्रवास सुरु झाला. आपला गौतमीशी काही संबंध नसल्याचंही त्यांनी म्हटलं.

Tags

follow us