अहमदनगर – नगर जिल्ह्याला हादरवून सोडणारी घटना राहुरी तालुक्यात घडली होती. वकिल दाम्पत्याची निर्घृणपणे हत्या (Lawyer couple brutally murdered) झाल्यानंतर वकिल संघटना (Advocates Association) आक्रमक झाल्या आहेत. वकिल संरक्षण कायदा त्वरित लागू करावा या मागणीसाठी शहर वकिल संघटनेच्या सर्व वकिलांनी दोन दिवसापासून न्यायालयीन कामकाज बंद ठेवत धरणे आंदोलन सुरु केले आहे. दरम्यान या प्रकरणी आता थेट राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लक्ष घातलं आहे. राज्यात वकिल संरक्षण कायदा होण्यासाठी ताकतीने लक्ष घातले जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री फडणीसांनी दिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘शिवसन्मान पुरस्कार’ जाहीर; साताऱ्यात शिवजयंतीला होणार वितरण
जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील मानोरी येथील राजाराम आढाव व मनीषा आढाव या वकिल पती-पत्नीचे अपहरण कूरन खून केल्याची घटना समोर आल्यानंतर एकच खळब उडाली होती. खंडणीसाठी केलेल्या या हत्या प्रकरणातील 5 संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले. दरम्यान, राहुरी येथील वकिल दाम्पत्याची हत्या झाल्यानंतर राज्यभर वकिलांचे धरणे आंदोलन सुरू आहेत. येत्या ३ फेब्रुवारीपर्यत वकिलांनी कामकाजावर बहिष्कार टाकला आहे.
बजेटमध्ये महिलांसाठी मोठी घोषणा; गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून सुटका?
वकिलांवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये मोठया प्रमाणावर वाढ होत असून ही चिंतेची बाब आहे. वकिलांना निर्भयपणे काम करण्यासाठी राज्यामध्ये तातडीने वकिल संरक्षण कायदा होणे गरजेचे आहे. अनेक वर्षांपासून वकील संरक्षण कायद्याची मागणी केली जात आहे. मात्र, अद्याप ही मागणी पूर्ण झाली नाही. आणि अशातच वकिलांवर हल्ले होण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. त्यामुळं वकिल संरक्षण कायदा त्वरित लागू करावा या मागणीसाठी शहर वकील संघटनेच्या सर्व वकिलांनी कामकाज बंद ठेवत धरणे आंदोलन सुरु केले आहे. नगर शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी व भाजपा वकिल आघाडीच्यावतीने वकिलांच्या आंदोलनास पाठिंबा जाहीर करण्यात आला.
यावेळी शहराध्यक्ष अॅड.अभय आगरकर यांनी आंदोलनस्थळाहून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांना शहरात सुरु असलेल्या धरणे आंदोलनाची माहिती दिली. या प्रश्नाबाबत आपण स्वतः लक्ष द्यावे, अशी विनंती यावेळी आगरकर यांनी फडणवीसांकडे केली. याला प्रतिसाद देत राज्यात वकिल संरक्षण कायदा होण्यासाठी लक्ष घालू, असे आश्वासन यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिले.