Dhangar Reservation : राज्यात सध्या मराठा आरसक्षणाच्या मुद्द्यावरून मोठे वातावरण तापले आहे. जालना येथे यासाठी आजही उपोषण सुरु आहे. हा प्रश्नावर अद्याप तोडगा निघालेला नसताना आता नगर जिल्ह्यातील चौंडी येथे धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा समोर आला आहे. महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या आरक्षणाचा वटहुकूम काढावा या मागणीसाठी यशवंत सेनेचे पदाधिकारी हे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थळ चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मारकासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. या उपोषण कर्त्यांची आमदार रोहित पवार यांनी भेट घेतली.
Maratha Reservation : मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसू नये; रोहित पवार आक्रमक
मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक झाला असताना आता धनगर समाजाने देखील आरक्षणासाठी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. यशवंत सेनेच्या वतीने चौंडीत उपोषण सुरू करण्यात आले आहे. जोपर्यंत वटहुकूम निघत नाही, तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा यशवंत सेनेचे बाळासाहेब दोडतले व महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष माणिकराव दांगडे पाटील यांनी दिला आहे.
2002 पर्यंत आरएसएसने तिरंगा का फडकवला नाही? मोहन भागवतांनी सांगून टाकलं…
दरम्यान आज राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. यावेळी धनगर आरक्षण आणि मेंढपाळांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी शासनाच्या योजनांच्या माध्यमातून सोडवण्यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांच्या मागण्या जाणून घेत उपोषणाला पाठिंबा दिला आणि तब्येतीची काळजी घेण्याची विनंती केली. यावेळी माजी मंत्री व यशवंत सेनेचे बाळासाहेब दोडतले, माणिकराव दांगडे व समाजबांधव यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
मराठा आरक्षणाचा प्रश्न फास्टट्रॅकवर: शिंदे सरकारच्या मॅरेथॉन बैठका, आणखी एका समितीची स्थापना
आरक्षण मिळविण्यासाठी मराठा समाजाच्यावतीने जालन्यातील अंतरवाली सराटी येथे आंदोलन करण्यात येत होते. आंदोलन सुरू असतानाच गुरुवारी सायंकाळी आंदोलनकर्ते व पोलिसांमध्ये वाद झाला. त्यानंतर पोलिसांनी काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यावरून जोरदार गोंधळ उडाला. त्याचवेळी जोरदार दगडफेक सुरू झाली. या दगडफेकीत दहा ते बारा पोलिस जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. दगडफेकीनंतर पोलिसांनी हवेत गोळीबार केला आहे. आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याचं पाहायला मिळालं.
Sharad Pawar यांनी मराठा नसलेल्या ठाकरेंना मुख्यमंत्री कसं केल? राणेंचा सवाल
आता मराठा समाजापाठोपाठ धनगर समाजही रस्त्यावर उतरत असल्याचं पाहायला मिळत आहे, मागील अनेक वर्षांपासून धनगर समाजाचा समावेश अनूसूचित जमाती प्रवर्गामध्ये करण्यात यावा, अशी मागणी धनगर समाजाकडून करण्यात येत आहे, अद्याप सरकारने यावर कोणताही निर्णय घेतलेला नसून सरकारने तत्काळ आमची मागणी मान्य करावी, असा पवित्रा धनगर समाजाकडून घेण्यात आला आहे.
दरम्यान, सरकारसमोर आधीच मराठा आरक्षण कसं द्यावं त्यावर विचार विनिमय सुरु असतानाच आता धनगर समाजानेही आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेतल्याने सरकार चांगलच कोंडीत सापडलं आहे. पुढील काळात मराठा आणि धनगर समाजाला सरकार आरक्षण देणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.