Sharad Pawar यांनी मराठा नसलेल्या ठाकरेंना मुख्यमंत्री कसं केल? राणेंचा सवाल

Sharad Pawar यांनी मराठा नसलेल्या ठाकरेंना मुख्यमंत्री कसं केल? राणेंचा सवाल

Sharad Pawar : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून शरद पवार (Sharad Pawar ) यांना भाजप आमदार नितेश राणे यांनी सवाल केला आहे की, पवारांनी मराठा समाजाच्या नसलेल्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री कसं केल? ते पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर होत असलेल्या टीकेला उत्तर दिले आहे.

Bharat Jadhav: भरत जाधवचे मोठ्या पडद्यावर कमबॅक; रवींद्रनाथ टागोरांच्या नाटकावर आधारित येणार सिनेमा

काय म्हणाले नितेश राणे?

भाजप आमदार नितेश राणे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर होत असलेल्या टीकेला उत्तर दिले आहे. ते म्हणाले, जालन्यात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचं जातीय राजकारण सुरू आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जे मराठा नसल्याने टीका केली जात आहे. मात्र फडणवीसांनीच मुख्यमंत्री असताना मराठ्यांना टीकणारं आरक्षण दिलं. तसेच माझा शरद पवारांना प्रश्न विचारायचा आहे. की, फडणवीसांच्या फक्त जातीवर राग आहे की, त्यांच्यावर राग आहे. मग महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री करताना मराठा समाजाच्या नसलेल्या उद्धव ठाकरेंची निवड कशी काय केली? ज्या ठाकरेंनी त्यांच्या मुखपत्रामध्ये मराठ्यांच्या आंदोलनाला मुका मोर्चा म्हटलं आहे. त्यांना मुख्यमंत्री का केलं?

संसदेच्या विशेष अधिवेशनापूर्वी सोनिया गांधींचे PM मोदींना खरमरीत पत्र; नऊ मुद्द्यांवरून घेरलं

पुढे राणे म्हणाले की, मराठ्यांच्या वंशजांना पुरावे मागणारे उद्धव ठाकरे चालतात मग फडणवीसांवर का वैयक्तिक आणि जातीय टीका केली जाते? मग याचं उत्तर मराठा समाजाला हवं आहे. तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकास काम केली. म्हणून त्यांच्यावर वैयक्तिक आणि जातीय टीका केली जात आहे. हे षडयंत्र लवकर थांबवाव. असं म्हणत भाजप आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना सवाल केला आहे.

मनोज जरांगेंना केलं आवाहन…

तसेच यावेळी बोलताना ज्या मनोज जरांगे यांच्या नेतृत्त्वामध्ये जलन्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. त्या मनोज जरांगे यांची प्रकृती खालावत चालली आहे. त्यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी त्यांना आंदोलन थांबवण्याचं आवाहन केलं आहे. ते म्हणाले की, समाज बांधव म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की, तब्बेतीकडे लक्ष द्या. तसेच तुमच्या आंदोलनाचा कुणाला वापर करू देऊ नका.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube