Download App

शेतकऱ्याचा सरकारविरोधात संताप, दीड एकरवरील कांद्याची केली होळी!

  • Written By: Last Updated:

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कांद्याच्या दरात (price of onions) मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हताश झाला आहे. शेतकऱ्यांनी कांदा भाववाढीसाठी अनेक आंदोलनं (agitations) केली, तरी सरकारकडून ( government) कांदा उत्पादकांची (Onion Farmer) दखल घेतल्या नाही, त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये रोष आहे. कांद्या उत्पादनातून नफा तर, लावडीचा लावलेला खर्च देखील निघत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे नाशिक (Nashik) जिल्ह्यामधल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यावर कांद्याची होळी (Holi) करण्याची वेळ आली आहे.

कांद्याला चांगला दर मिळून चार पैसे हातात येतील या आशेने नाशिकच्या येवला येथील शेतकऱ्यांनी काबाडकष्ट करून कांद्याची लागवड केली. त्यांच्या कष्टाला यशही मिळाले. मात्र बाजारपेठेत भाव मिळाला नाही. त्यामुळं कांद्याला मिळणारा मातीमोल भाव आणि शासनाची निष्क्रियता याचा निषेध करण्यासाठी येवला येथील शेतकरी कृष्णा डोंगरे यांनी आपल्या दीड एकरातील कांदा पिकाला अग्निडाग देऊन कांद्याचीच होळी केली आहे. या शेतकऱ्याने काही दिवसांपूर्वी कांदा अग्निडाग समारंभ आयोजित केल्याची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या समारंभास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील निमंत्रण पाठवण्यात आलं होतं. मात्र सीए शिंदे हजर न राहिल्याने त्याने स्वत:च कांद्याची होळी पेटविली.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी नाफेड बाजार समित्यांत येऊन कांदा खरेदी करेल अशी घोषणा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केली होती. मात्र अजूनही नाफेडची खरेदी सुरू झालेली नाही. कांद्याची होळी पेटवत संतप्त शेतकऱ्यांनी सरकारच्या नावाने बोंबाबोंब करून निषेध व्यक्त केला. केंद्र आणि राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडून दिले आहे. शेतकरी जगला काय आणि मेला काय सरकारला देणे- घेणे नसल्याचे सांगत डोंगरे यांनी कांदा उत्पादकांची व्यथा मांडली.

ते म्हणाले, कांदा कवडीमोल भावाने विकावा लागत असल्याने शेतकरी कर्जबाजारी होत आहे. औषधफवारणी, रासायनिक खते, मजुरी पाहता दीड एकर कांदा पिकविण्यासाठी दीड लाख रुपये खर्च करावा लागला. हा कांदा काढण्यासाठी किमान 30 हजार रुपयांचा खर्च आला. हा खर्च वसूल होणं सध्याच्या काळात अवघड झाल्यानं कांद्याची होळी पेटवल्याची संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली.

आलियाच्या आरोपांवर Nawazuddin Siddiqui तोडले मौन; म्हणाला, “ती माझ्याकडून महिन्याला…”

या शेतकऱ्याची आई मंदाबाई डोंगरे यांनी याबाबत बोलतांना सांगितलं की, माझ्या मुलाने शेतात काबाडकष्ट करून पिकवलेल्या कांद्याला सणाच्या दिवशी पेटवून द्यावे लागले. यापेक्षा वाईट गोष्ट काय असू शकते? यावेळी माझे हृदय हेलावले. त्याने हे करताना जिवाचे बरे-वाईट करू नये, असं देखील वाटत होते. अशी वेळ कुणावरही येऊ नाही. दरम्यान, शासनाने याची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

नाशिक जिल्हा हा कांद्याची पंढरी म्हणून संपूर्ण आशिया खंडात ओळखला जातो. मात्र गेल्या काही दिवसांपासून कांदा दरात घसरण झाल्याने याच कांद्याच्या पंढरीतील शेतकऱ्यांवर कांद्याचीच होळी करण्याची वेळ आली. त्यामुळे शासन आता तरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची दखल घेऊन त्यांच्या शेतमालाला योग्य भाव देणार का, हेच पाहणं महत्वाचं आहे.

 

Tags

follow us