Download App

बांधावर जाण्याची स्टंटबाजी करण्यापेक्षा आमदार लंकेंनी सरकारच्या दारात जाऊन बसावं… झावरेंचा खोचक टोला

Ahmednagar News : नगर शहरासह जिल्ह्यात रविवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. पारनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान देखील झाले. दरम्यान नुकतेच आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात नुकसानग्रस्त भागाची यांची पाहणी केली. मात्र आता यावरून देखील राजकारण दिसून येऊ लागले आहे. लंके व भाजप नेत्यांनी बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करण्याची स्टंटबाजी करण्याऐवजी शेतकर्‍यांना तातडीने नुकसान भरपाई कशी मिळेल, यासाठी शासन दरबारीं पाठपुरावा करावा असे, मत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे (Sujit Jhaware) यांनी केले आहे.

नगर शहरासह रविवारी पारनेर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. तसेच पारनेरमध्ये मोठ्या प्रमाणावर गारपीट देखील झाली. गारपिटीमुळे शेतात उभी असलेली पिके जमीनदोस्त झाली. अवकाळीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्याच्या मदतीसाठी व नुकसानीची पाहणीसाठी पारनेरचे आमदार निलेश लंके हे भल्या सकाळीच शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले. यावेळी झालेल्या नुकसानीची पाहणी करत लंके यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मदत मिळवून देण्याच्या आश्वासन दिले.

देवदर्शनावरून परतणाऱ्या भाविकांच्या कारला अपघात, चौघांचा मृत्यू, तर 7 जण गंभीर जखमी

मात्र अवकाळी पावसावरून देखील जिल्ह्यात राजकारण तापू लागले आहे. लंके यांनी पारनेर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची बांधावर जाऊन पाहणी केली. यावर बोलताना झावरे म्हणाले, प्रत्येकवेळी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याची स्टंटबाजी आ. लंके आणि भाजप नेत्यांनी सोडावी. नुकसानग्रस्त भागांचा दौरा करणे हे केवळ नाटक आहे. आज केंद्रात व राज्यात आपली सत्ता आहे केवळ राजकीय स्टंटबाजी करण्याऐवजी शासन दरबारी पाठपुरावा करत शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळेल यासाठी प्रयत्न करावे, असा खोचक टोला झावरे यांनी आमदार निलेश लंके व भाजप नेत्यांना लागवला.

Tags

follow us