Nandurbar tricked the police by pretending to be MP Amol Kolhe’s PA : गेल्या काही दिवसांपासून आर्थिक फसवुकीच्या प्रकारांत मोठी वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी एका तोतयाने आपण जेपी नड्डा यांचे पीए असल्याचं सांगून अनेक भाजप आमदारांकडून मोठी रक्कम वसूल केली होती. अशीच एक आर्थिक फसवणूकीची घटना आता नंदुरबार पोलिसांसोबत घडलीये. नंदुरबारचे जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून खासदार अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) यांचे पी.ए. असल्याचं सांगून फसवणूक करण्याच आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनसुार, गुरुवारी (ता. 1) रात्री अकरा वाजता पोलीस अधीक्षक पाटील यांच्या मोबाईल क्रमांकवर एका अनोळखी नंबरवरून काही काम असल्याचा संदेश आला. त्यानंतर पाटील यांनी आपले जनसंपर्क अधिकारी पोलीस उपनिरीक्षक हेमंत मोहिते यांना हा अनोळखी व्यक्तीचा नंबर देऊन मदत करण्यास सांगितले. मोहिते यांनी तात्काळ मोबाईल क्रमांकावर फोन केला असता संबंधित व्यक्तीने आपलं प्रबोधचंद्र सावंत असल्याचं सांगितलं. एवढच नाही तर समोरच्या व्य्कतीने आपण खासदार कोल्हे यांचा पीए असल्याची बतावणी केली.
दिव्यांग व्यक्तींना पुनर्वसनासाठी वित्तीय सहाय्य योजना
तसेच त्यांच्या मतदार संघातील लोकांच्या वाहनाला शहाद्यामध्ये अपघात झाला असून त्यांना तातडीने मदत करण्यात यावी, असे सांगितले. पीए असल्याची बतावणी करणाऱ्या व्यक्तीने अपघातग्रस्तांचा मोबाईल क्रमांकही दिला. मोहिते यांनी या क्रमांकावर कॉल केला असता, भ्रमणध्वनीधारकाने आपले नाव रविकांत मधुकर फसाळे असे सांगून शहादा येथे त्यांच्या बोलेरो गाडीला झालेल्या अपघातात 04 जण ठार तर 7 ते 8 जण जखमी झाले असे सांगितलं. त्यांच्यावर नंदुरबार येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगितले.
या अपघाताविषयी तात्काळ मदती व्हावी, यासाठी मोहिते यांनी नियंत्रण कक्षाकडून माहिती मागवली. मात्र, अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे मोहिते यांनी समजले. त्यानंतर त्यांनी मोहिते यांना पुन्हा फसाळे यांनी तातडीने रुग्णवाहिकेने पुण्याला जायचं असं वाहनातील डिझेलसाठी सात हजार रुपयांची मागणी केली.
त्यानंतर काही वेळाने फसाळे यांनी मोहिते यांना फोन करून सकाळपासून काहीही खाल्ले नसल्याने जेवणासाठी दोन हजार रुपये देण्यास सांगितले.
याबाबत मोहिते यांनी सावंत यांना विचारले असता त्यांनीही त्यास दुजोरा देत खासदार कोल्हे यांचा निरोप असल्याचे सांगितले. मोहिते यांनी माणुसकीच्या नात्याने फसाळे यांच्या फोन पे खात्यावर 1000 रुपयांची मदत पाठवली.
दरम्यान, या संपूर्ण घटनेनंतर मोहिते यांनी शुक्रवारी सकाळी नियंत्रण कक्षामार्फत या अपघातातची खात्री केली असता, नंदुरबार जिल्ह्यात किंवा जवळपासच्या जिल्ह्यात अशी कोणतीही दुर्घटना घडली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 च्या कलम 66(डी) सह कलम 420, 182 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.