दिव्यांग व्यक्तींना पुनर्वसनासाठी वित्तीय सहाय्य योजना
LetsUpp l Govt. Scheme
व्यावसायिक प्रशिक्षण (Vocational training)पूर्ण केलेल्या अपंगांना त्यांचा स्वत: व्यवसाय (Business) सुरु करण्यासाठी वित्तीय सहाय्य या योजनेत (अंध,अल्पदृष्टि, कर्णबधिर,अस्थिव्यंग) व्यक्तींना उद्योगांबाबत रु 1000/- साधन सामुग्रीच्या (Tool content)स्वरुपात आर्थिक मदत करून रोजगार निर्मिती करणे.
कोल्हापूर-हातकणंगले : राष्ट्रवादीचं झालं थोडं अन् आता काँग्रेसनं धाडलं घोडं… शिवसेना कोंडीत!
योजनेच्या प्रमुख अटी :
विहीत नमुन्यात अर्ज सादर करावा.
अर्जदाराचे दिव्यांग किमान 40 टक्के अथवा त्यापेक्षा जास्त असावे.
लाभार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
आवश्यक कागदपत्रे :
– सरकार मान्य संस्थेतून व्यवसाय शिक्षण उत्तीर्ण झालेला दाखला अर्जासोबत जोडावा.
– रहिवासी दाखला
– दिव्यांग असल्याचा दाखला
– धंदयासाठी लागणाऱ्या साधनांची यादी व त्यांची अंदाजित किंमत लिहून अर्जासोबत जोडावी.
लाभाचे स्वरूप : अपंग व्यक्तींना उद्योगांबाबत रु 1000/- साधन सामुग्रीच्या स्वरुपात आर्थिक मदत दिली जाते.
संपर्क कार्यालयाचे ठिकाण : जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद सर्व व सहाय्यक आयुक्त