Jalgaon Crime : जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव (Chalisgaon) येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. भाजपचे माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी (Prabhakar Chaudhary) यांच्यावर अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात चौधरी गंभीररित्या जखमी झाले आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत.
वैष्णो देवी यात्रा मार्गावर दरड कोसळली, 31 जणांचा मृत्यू, 23 जखमी, 22 ट्रेनही रद्द
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्रीच्या वेळी, काही अज्ञात हल्लेखोरांनी वैष्णवी साडी सेंटरजवळ त्यांना अडवून त्यांच्यावर धारदार कोयत्याने वार केले. या हल्ल्यात चौधरी यांना मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला असून ते गंभीर जमखी झाले आहेत. स्थानिक रुग्णालयात प्राथमिक उपचार घेतल्यानंतर त्यांना तातडीने पुढील उपचारांसाठी धुळे येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
प्रभाकर चौधरी हे चाळीसगावमध्ये भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. दोनच दिवसांपूर्वी त्यांच्या कार्यालयाचे उद्घाटन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते झाले होते.
दरम्यान, हल्ल्याच्या घटनेबद्दल समजल्यानंतर पोलिसांनी लगेच पावलं उचलत तातडीने तपास सुरु केलाय. पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. तसेच, हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळ्या भागात पथके रवाना केली आहेत. या घटनेमागे कोणताही राजकीय किंवा वैयक्तिक वाद आहे का याचा तपास पोलिस करत आहेत.
प्रभाकर चौधरी यांच्यावरील हल्ल्याचा भाजप कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध केला आहे. या घटनेमुळे चाळीसगावमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.