शिंदेंचा ठाकरेंना पुन्हा दे धक्का! माजी नगरसेवक रामदास कांबळेचा शिवसेनेत प्रवेश

Ramdas Kamble joins Shiv Sena : आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका (Local government elections) होणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर शिंदे गट मुंबईत आपली ताकद वाढवत आहे. आज मुंबई महानगरपालिकेतील (Mumbai Municipal Corporation) सायन कोळीवाडा प्रभाग क्रमांक १७३चे उबाठा गटाचे माजी नगरसेवक रामदास कांबळे (Ramdas Kamble) यांनीही आनंदआश्रमात येऊन शिवसेनेमध्ये (Shiv Sena) जाहीर प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भगवा झेंडा हाती देत त्यांचे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत केले.
लष्करी अधिकाऱ्याकडून स्पाइसजेट कर्मचाऱ्याला बेदम मारहाण, पाठीचा कणाच फ्रॅक्चर केला, Video व्हायरल
यावेळी कांबळे यांच्यासह शाखा संघटीका नंदा बापू शाहू, उपशाखा संघटीका नंदा
पाटसुभे, सुचित्रा कावळे, दीपिका नेमन, श्वेताली खेडपकर, देविका नायर आणि सर्व पदाधिकारी यांचाही पक्षप्रवेश झाला. यासोबत रेखा तिवारी, मालन सावंत, लक्ष्मी कोतवाल, अनिता सावंत, अपूर्वा पालव, युवासेना अधिकारी सचिन पडवळ, सहार येले, विनोद शर्मा यांनीही शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला.
कांबळे यांचा पक्षप्रवेश होताच एकनाथ शिंदेंनी त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिलीय. रामदास कांबळे यांची युवक कार्यकारणीमध्ये सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.
‘महादेवी’ हत्तीणीसाठी कोल्हापूरकर एकवटले, पदयात्रेत हजारोंचा सहभाग; खासदारांनीही दिली आनंदाची बातमी
यावेळी बोलताना शिंदे यांनी मुंबईतील अनेक माजी लोकप्रतिधी आजही शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करत आहेत. पक्षप्रवेशांचा ओघ अद्यापही कमी झालेला नाही. रामदास कांबळे यांच्या मतदारसंघात संक्रमण शिबिरात राहणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असून त्यातील बहुतांश प्रश्न हे म्हाडा आणि एसआरए प्राधिकरणाची संबंधित आहेत, हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी ते शिवसेनेसोबत आले असून शासनाच्या माध्यमातून हे प्रश्न नक्की सोडवण्याचा प्रयत्न करू, असे शिंदे म्हणाले.
गेल्या अडीच वर्षाच्या माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात काँक्रिट रस्ते, मुंबईचे सुशोभिकरण, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, कॅशलेस वैद्यकीय सेवा, डीप क्लीन ड्राइव्ह असे अनेक उपक्रम आपण शहरात राबवले. कोस्टल रोड, अटल सेतू, महालक्ष्मी रेस्कोर्सच्या जागेवर तयार होणारे सेंट्रल पार्क असे अनेक प्रकल्प मार्गी लावले. त्याद्वारे मुंबईचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही केला असून मुंबईबाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईमध्ये आणण्यासाठी अम्ही काम करत आहोत आणि यापुढेही करत राहू,असंही शिंदे यांनी म्हटलं.
यावेळी माजी खासदार राहुल शेवाळे, माजी शिक्षण समिती सभापती मंगेश सातमकर, आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.