Ghanshyam Shelar : नगर दक्षिण मतदारसंघातून महायुतीकडून भाजपने विद्यमान खासदार सुजय विखेंना उमेदवारी दिली आहे. तर शरद पवार गटाने निलेश लंके (Nilesh Lanke) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. अशातच आता बीआरएसचे नेते घनश्याम शेलार (Ghanshyam Shelar) हे देखील लोकसभा (Loksabha election) लढू शकतात. नगर दक्षिण मतदारसंघातील समस्यांची जाण असलेले व त्या समस्या सोडविण्याची क्षमता असलेल्या शेलार यांनी लोकसभा निवडणूक लढवावी, अशी कार्यकर्त्यांची व सर्वसामान्यांची मागणी आहे. त्यासाठी मतदारसंघातील सुमारे 100 कार्यकर्त्यांनी नुकतीच शेलार यांची भेट घेतली होती.
Student Of The Year: ‘स्टुडंट ऑफ द इयर 3’चा सिक्वेल बनवणार; निर्मात्याची मोठी घोषणा
लोकसभा निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांची मत जाणून घेऊन निर्णय घेणार असल्याचे घनश्याम शेलार यांनी सांगितले आहे. त्या अनुषंगाने शेलार समर्थकांचा मेळावा येत्या 10 एप्रिल रोजी आयोजिच करण्यात आल्याची माहिती बीआरएसच्या ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष संजय आनंदकर यांनी दिली.
संजय आनंदकर म्हणाले, गेल्या 40 वर्षांपासून राजकारण आणि सामाजिक कार्यात सक्रिय असलेले घनश्याम शेलार यांना श्रीगोंदा तालुक्यासह संपूर्ण नगर दक्षिण मतदारसंघाच्या प्रश्नांची जाण आहे. आणि हे प्रश्न सोडवण्याची क्षमता त्यांच्यात असल्याने लोकसभा निवडणुकीत ते एक उत्तम पर्याय ठरू शकतील. त्यांच्या 40 वर्षांच्या राजकीय प्रवासात त्यांची प्रतिमा संघर्षशील योद्धा अशी राहिली आहे. घोड, कुकडीचा पाणी प्रश्न, साकळाई उपसा सिंचन योजना, तालुक्यातील रस्ते आणि वीजेच्या प्रश्नांसंदर्भात त्यांनी सातत्याने लढा दिलेला असून सामान्य जनतेला त्यांचाच आधार वाटतो.
Shaitan: काळी जादू दाखवायला आर. माधवन तुमच्या घरी येतोय; कधी आणि कुठे पाहाल सिनेमा?
शेलार यांनी यापूर्वी जिल्हात आणि राज्य पातळीवर काम केले असून त्यांची कामाची हातोडी त्यांना लोकसभा निवडणुकीत नक्कीच तारणारी ठरू शकते. सामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक व्हावी, यासाठी शेलार यांनी लोकसभा निवडणुकीत उमेदवारी करण्याची आमची मागणी आहे. शेलारांना उमेदवारी करण्याचे साकडे घालण्यासाठी मतदारसंघातील १०० हून अधिक प्रमुख कार्यकर्त्यांसह आपण काल शेलार यांची भेट घेऊन त्यांना उमेदवारी करण्याचा आग्रह केला.
10 तारखेला शेलार समर्थकांची बैठक
उपस्थित कार्यकर्त्यांची आग्रही भूमिका समजून घेतल्यानंतर शेलार यांनी मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन आणि त्यांच्याशी विचार विनिमय करून याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. त्या अनुषंगाने 10 एप्रिल रोजी मतदारसंघातील शेलार यांच्या समर्थकांची बैठक श्रीगोंदा येथे आयोजित करण्यात आली आहे.