Shaitan: काळी जादू दाखवायला आर. माधवन तुमच्या घरी येतोय; कधी आणि कुठे पाहाल सिनेमा?

Shaitan: काळी जादू दाखवायला आर. माधवन तुमच्या घरी येतोय; कधी आणि कुठे पाहाल सिनेमा?

Shaitan OTT Release: बॉलिवूड (Bollywood) अभिनेते अजय देवगण (Ajay Devgan) आणि आर. माधवन (R. Madhavan) स्टारर ‘शैतान’ (Shaitan Movie) हा चित्रपट सध्या थिएटरमध्ये दाखल होत आहे. (Shaitan OTT Release) या चित्रपटाला खूप पसंती दिली जात आहे. या अलौकिक थ्रिलरला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपटाच्या कथेसोबतच त्यातील पात्रांचेही खूप तोंडभरून कौतुक झाले.

हा चित्रपट 8 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला, जो या वर्षातील आतापर्यंतच्या सर्वात हिट चित्रपटांपैकी एक आहे. याने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली असून, आतापर्यंत 137 कोटींची कमाई केली आहे. दरम्यान, आता शैतानच्या ओटीटी रिलीझबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. थिएटरमधील मोठ्या कामगिरीनंतर ‘शैतान’ आता ओटीटीवर दहशत निर्माण करण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘शैतान’ कधी आणि कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर पाहता येईल चला तर मग पाहूया…

‘शैतान’ OTT रिलीज

मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर सुमारे दोन महिन्यांनी OTT प्लॅटफॉर्मवर येतो. याचा अर्थ ‘शैतान’ मे महिन्यात डिजिटलवर रिलीज होणार आहे. असे म्हटले जात आहे की, चित्रपटाचे डिजिटल अधिकार नेटफ्लिक्सकडे देण्यात आले आहेत, आणि तो 3 मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल. परंतु त्याची अधिकृत घोषणा अद्याप झाली नाही.

Amruta Khanvilkar च्या अभिनयाची झाकीर खानला भुरळ; लुटेरेतील अभिनयाचं केलं कौतुक!

चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन

बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर हा चित्रपट भारतासह जगभरात चांगले कलेक्शन करत आहे. ‘शैतान’ लवकरच जगभरात 200 कोटींचा आकडा पार करणार आहे. या चित्रपटाने 23 दिवसांत देशात एकूण 137 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. 65 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवलेल्या या सुपरनॅचरल-हॉरर-थ्रिलरने जगभरात सुमारे 195 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

सध्या ‘शैतान’ हा 2024 मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. इतकी कमाई करणारा हा पहिलाच हॉरर चित्रपट आहे. अजय देवगण आणि आर माधवन व्यतिरिक्त या चित्रपटात ज्योतिका आणि जानकी बोडीवाला यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन विकास बहल यांनी केले आहे. हा चित्रपट गुजराती चित्रपट ‘वश’चा हिंदी रिमेक असल्याचं बोललं जात आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube