Download App

एकनाथ खडसेंची मस्ती अजून जिरली नाही का? गिरीष महाजनांचा हल्लाबोल

Girish Mahajan on Eknath Khadse : भाजपने आपली आश्वासने कधीच पूर्ण केली नाहीत. विशेष करुन देवेंद्र फडणवीस यांना मस्ती आलेली आहे, त्यांची मस्ती जिरवावी लागेल, अशी जहरी टीका एकनाथ खडसे यांनी केली होती. त्यांच्या टीकेला मंत्री गिरीष महाजन यांनी प्रत्युत्तर दिले आहे. एकनाथ खडसेंची मस्ती अजून जिरली नाही का? असा हल्लाबोल केला आहे.

गिरीष महाजन म्हणाले की खडसे साहेबांची मस्ती अजून जिरली नाही का? तुम्ही कुठे बसला आहात. दहा दहा मंत्रीपदं घेताना काही वाटलं नाही का? तुमची मस्ती लोकांनी आणि बिल्डरने बघितलेली आहे. तुम्ही काय धंदे केलेले आहेत ही त्याचीच फळ तुम्ही भोगत आहात, असा हल्लाबोल त्यांनी केला.

‘आमच्या भूमिकेवरच निवडणूक आयोग शिक्कामोर्तब करणार’; सुनिल तटकरेंनी व्यक्त केला विश्वास

आता कशाला उर बडवत आहात. तुम्ही चांगलं काम केलं असतं? तीस-पस्तीस वर्षे पार्टीत होतात, सर्वात जास्त पदे तुम्ही भोगली. सर्वात जास्त लाल दिव्याच्या गाड्या विरोधी पक्षनेते असताना तुम्ही भोगल्या आहेत. आता दोन वर्षांमध्ये आमची मस्ती दिसली का? तुमची मस्ती लोकांनी उतरवलेली आहे, अशी टीका गिरीष महाजन यांनी केली.

Teacher’s Day : लाल दिव्याच्या गाडीत एन्ट्री, पोलिसांचा सॅल्यूट अन् आयुक्तपदाचा कारभार

विधानसभेत पाडलं, दूध डेअरीतून हाकलले, बॅकेतून हाकलले, तुमच काय राहिलंय? आम्ही आमच्या ठिकाणी योग्य आहेत. देवेंद्र फडणवीस बरोबर आहेत. पण तुमचं काय राहिले? तुमचे हाल कोण खातंय आज? अशी जहरी टीका गिरीष महाजन यांनी केली. फडणवीसांना माफी मागायची सवाय लावावी लागेल, अशी टीका खडसेंनी केली होती. यावर महाजन म्हणाले की माफी मागायला मोठेपणा लागतो मनाचा, असेही ते म्हणाले.

Tags

follow us