MLA Gopichand Padalkar on Dhiraj Pardeshi Case: अहिल्यानगर महानगरपालिकेचा कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी याची मुकुंदनगरमध्ये हल्ल्यात मृत्यू झाला आहे. या प्रकरण आता शहरात तापले आहे. सोमवारी हिंदुत्ववादी संघटनेने शहर बंद पुकारला होता. त्याला प्रतिसाद मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी या प्रकरणात दोन दिवसांपासून आक्रमक भूमिका घेतलीय. आता या प्रकरणात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांची
(Gopichand Padalkar) एंट्री झालीय.
मुकुंदनगरमध्ये हिंदू का कमी झाले ? पडळकर
अहिल्यानगरमध्ये येत पडळकरांनी या प्रकरणाची माहिती घेतलीय. या प्रकरणात एक मुख्य आरोपी असल्याची कुजबूज आहे. या मुख्य आरोपीचा पोलिसांना शोध घेतला पाहिजे. मुख्य आरोपी मातीत गाडला गेला असेल तर त्याला शोधा असे आवाहन पडळकरांनी पोलिसांना केले आहे. आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, सरकारी कर्मचारी आहे, सरकारी कामानिमित्त त्या परिसरात गेला होता. अशा कर्मचाऱ्याचा कपाळावर भगवा टिळा बघून, त्याला मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. मुकुंदनगर भाग हा पूर्वी हिंदूबहुल भाग होता. आता तिथे हिंदू राहिलेले नाहीत. हिंदूच अल्पसंख्याक झालेले आहेत. हिंदू अल्पसंख्याक होण्याचे कारणे काय आहेत ? प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आपण काय पाकिस्तानात राहतो का ? हिंदू कमी होण्याचे कारण काय ? इथे लोकांना, मुलींना, महिलांना त्रास दिला जातो. नको-नको करून सोडतात. घरे मोफत सोडून जातात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट का घेतली?, काय म्हणाले अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके?
तुमच्या मोहल्य्ता आला म्हणून….
हा मुलगा तिकडे गेला तर मारहाण केली. कारण काय आहे मारहाण करायला? पाच लोकांना अटक केली आहे. ती
लोक कोण आहेत. त्यांचा या सर्व प्रकरणात भाग काय आहे. यात मुख्य आरोपी आहे, त्या आरोपीला अटक करा, सर्वांच्या घरावर बुलडोझर फिरवा. यांना बेघर करून टाका. धीरज परदेशीच्या कुटुंबाला बेसहारा केलेले आहेत. त्यांना कायद्याची भिती वाटत नाही. ते संविधान मानत नाहीत. धीरज परदेशीला मारण्याचे कारण काय आहे. तुमच्या मोहल्यात आला म्हणून मारून टाकायचे का ? पोलिसांनी गांभीर्याने हे प्रकरण तपासायला हवे, असे गोपीचंद पडळकर म्हणाले.
CINTAA बरखास्त झाल्याचा दावा चुकीचा’; 68 वर्षांची संस्था अफवांमुळे कमजोर होऊ शकत नाही
पोलिस अधिकारी कार्यकर्तच्यांना अडकविण्याची धमकी देतात…
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांबाबत हिंदू कार्यकर्त्यांच्या तक्रारी आहेत. या कार्यकर्त्यांना अधिकारी खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देतात. एक-दोन अधिकारी चुकीचे पद्धतीने वागत असतील, तर एसपींनी याकडे लक्ष द्यावे. मुख्य आरोपीचा शोध घेतला जात नाही, अशी कुजबूज आहे. मुख्य आरोपी मातीत गाडला गेला असेल, तर त्याला शोधून काढा. हे प्रकरण कशामुळे घडलंय याचा शोध घ्या. याला वेगळे वळण देऊ नका ? जे असेल ते शोधा, असे पडळकर म्हणाले. या प्रकरणाची सर्व माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगणार असल्याचे पडळकर यांनी स्पष्ट केले.
