पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट का घेतली?, काय म्हणाले अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके?
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सर्व खासदारांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. त्यावर खासदा लंके काय म्हणाले?
शेतकरी, आणि आरोग्याच्या प्रश्नांवर आम्ही (PM) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात कॅन्सर रुग्ण आहेत तीच परिस्थिती आता महाराष्ट्रात उद्भवली आहे. त्यामुळं कॅन्सरच्या बाबात सर्वत्र रुग्णालय व्हावेत अशी मागणी आम्ही पंतप्रधान मोदी यांच्याकडं केल्याचं अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी लेट्सअपशी बोलताना सांगितलं.
पीएम रिलीप फंडाचा कोटा वाढला पाहिजे. कारण एका खासदाराला एका वर्षात फक्त 35 लोकांनाचा लाभ मिळवून देता येतो. त्यामुळं याची मर्यादा वाढावी अशी मागणीही आपण केल्याचं लंके म्हणाले. तसंच, आज खासगी रुग्णालयाच उपचार घेण लोकांना परवडत नाही त्यासाठी सरकारी रुग्णालयाची व्यवस्था व्हावी अशीही मागणी केली आहे.
त्याचबरोबर महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 गडकिल्ले आहेत. त्यामध्ये 12 किल्ल्यांना अ दर्जा आहे. परंतु, सगळ्या किल्ल्यांना हा दर्जा दिला जावा, त्याचं संवर्धन व्हाव अशी मागणी मांडल्याचं लंके म्हणाले. आम्ही 11 वाजता भेटलो. वीस ते पंचवीस आमची भेट झाली. सर्व खासदारांनी आपपल्या मागण्या मांडल्या असंही लंके म्हणाले. दरम्यान, राजकीय चर्चा झाली नसल्याचं लंके म्हणाले आहेत.
राष्ट्रवादी विलीनीकरण होणार, राष्ट्रवादी शरद पवार गट भाजपसोबत जाणार अशी चर्चा होती त्यावर काही बोलणं झालं का? असं विचारलं असता, लंके म्हणाले यावेळी कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. आमच्या चर्चेचा महत्वाचा मुद्दा हा लोकांचे मुलभूत प्रश्न होते. त्यामुळं कोणतीही दुसरी चर्चा नाही असं लंके म्हणाले. दरम्यान, पक्ष एनडीएसोबत जाणार आहे तर अशी कुठलीही चर्चा नाही असंही ते म्हणाले.