Download App

धर्मांतराविरोधात आमदार पडळकरांचा चंग, विधासभेत लक्षवेधी मांडणार

धर्मांतर बंदी कायदा लागू करावा, लव्ह जिहाद विरोधी कायदाही करण्यात यावा. धर्मांतरविरोधात कायदा आणण्यासाठी मी विधानसभेत लक्षवेधी मांडणार

  • Written By: Last Updated:

Gopichand Padalkar : सांगलीतील ऋतुजा राजगे (Rutuja Rajge Suicide Case) आत्महत्या प्रकरणी धर्मांतरविरोधात कायद्यासाठी विधानसभेत लक्षवेधी मांडणार असल्याचं भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी (Gopichand Padalkar) स्पष्ट केलंय. ते अहिल्यानगरमध्ये माध्यमांशी बोलत होते.

नांदेडात शरद पवारांना धक्का! आमदाराच्या उपस्थितीत ‘या’ दोन बड्या नेत्यांच्या हाती घड्याळ.. 

ख्रिश्चन धर्मांतरासाठी झालेल्या अमानुष छळातून ऋतुजा राजगे या उच्चशिक्षित विवाहित मुलीने आपलं जीवन संपवल्याची घटना सांगलीत घडली. मृत्यू समयी ऋतुजा ही सात महिन्यांची गर्भवती देखील होती. त्यामुळे तिच्या मृत्यूने सांगलीसह महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली गेली. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ अहिल्यानगरमध्ये आज हिंदुत्ववादी संघटनांकडून मोर्चा काढण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करुन मोर्चाला सुरुवात झाली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ छोटेखानी सभा पार पडली. या मोर्चात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह आमदार संग्राम जगताप यांनी हजेरी लावली.

तुमची किडनी खराब होतेय? शरीर देते ‘असे’ संकेत, वेळीच ओळखा अन् सावध व्हा… 

यावेळी आ. गोपीचंद पडळकर यांनी जिल्ह्यातील बेकायदेशीर चर्च आणि मदरसे यांच्यावर बुलडोझर फिरविण्याची मागणी केली आहे. त्याचप्रमाणे सरकारी कार्यालयात जातीचे खोटे दाखले देऊन नोकरी मिळविणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

धर्मांतर बंदी कायदा लागू करा
गोपीचंद पडळकर म्हणाले की, हिंदू धर्मियांचं धर्मांतरण झालं पाहिजे, यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहे. हिंदू ही जगातील एक आदर्श संस्कृती आहे. या संस्कृतीविषयी जगभर आस्था आणि आकर्षण आहे. मात्र, मुस्लीम आणि ख्रिश्चन हे फसवणूक करून तसेच आमिषं दाखवून हिंदूंचे धर्मांतरण करत आहे. सर्वात जास्त धर्मांतरणाची प्रकरणे अहिल्यागर जिल्ह्यात होत आहे. असं होऊ नये यासाठी धर्मांतर बंदी कायदा लागू करावा, लव्ह जिहाद विरोधी कायदाही करण्यात यावा. धर्मांतरविरोधात कायदा आणण्यासाठी मी विधानसभेत लक्षवेधी मांडणार असल्याचं गोपीचंद पडळकरांनी स्पष्ट केलंय.

follow us