अजित पवारांच्या लेकाचा साखरपुडा; पाहा जय पवार अन् ऋतुजा पाटलांचे खास फोटो

- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कनिष्ठ सुपुत्र जय पवार यांचा गुरूवारी साखरपुडा पार पडला.
- फलटणचे प्रवीण पाटील यांच्या कन्या ऋतुजा पाटील यांच्याशी जय पवार हे लग्नगाठ बांधणार आहेत. त्या अगोदर त्यांचा साखरपुडा पार पडला.
- या कार्यक्रमानिमित्त संपूर्ण पवार आणि पाटील कुटुंब एकत्र आलं होतं.
- त्याचे काही खास फोटो खासदार सुप्रिया सुळे यांनी शेअर केले आहेत.
- या कार्यक्रमामध्ये जय यांनी पांढरा जोधपुरी परिधान केला होता. तर ऋतुजा यांनी डिझायनर साडी परिधान केली होती.
- तर संपूर्ण पवार आणि पाटील कुटुंब या कार्यक्रमामध्ये खास अशा पेस्टल कलर्सच्या पोशाखामध्ये पाहायाला मिळालं