Download App

सरकारी कंत्राटी नोकर भरतीचा जीआर म्हणजे तरुणांचे शोषण, राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक

Kantrati nokar bharti gr : राज्य सरकारने नुकतेच 6 सप्टेंबरला राज्य शासनातील महत्त्वाच्या अधिकारी पदासह कार्यालयातील अनेक महत्त्वाची पदे ही कंत्राटी पद्धतीने भरण्याचा शासन निर्णय काढला आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या वतीने आज अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सलीमठ यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी युवक अध्यक्ष प्रकाश पोटे समवेत शहर जिल्हा अध्यक्ष अभिषेक कळमकर, भीमराज कराळे, अभिषेक जगताप, प्रणव कदम, ओमकार नवरखेले आदी उपस्थित होते.

कंत्राटी पद्धतीने भरण्याचा शासन निर्णय काढला हे सर्व पदे अ,ब,क,ड, या सवर्गातील जागा असून एवढ्या मोठ्या प्रमाणात केवळ कंत्राटी पद्धतीने भरती होणार असेल तर ही बाब नक्कीच संशयित आहे. एकीकडे राज्य बेरोजगारीने कहरला आहे. अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण काम मिळत नाही म्हणून रिकामे किंवा पर्यायाने आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत आहे.

समाजातील बहुजन आणि त्यातही मागास असलेल्या लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची लढाई जोरदार सुरू असताना हाच आरक्षणाचा ढोंगी निर्णय घेण्याचा विचार राज्य सरकार करत आहे का? हा प्रश्न या निमित्ताने युवक वर्गाला पडला आहे. या कंत्राटी कामगार भरतीने नेमका या आरक्षणालाच खो घालण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. असे यातून दिसत आहे.

शिर्डीत राष्ट्रवादीचे राज्यव्यापी शिबीर; शरद पवार नगरच्या शिलेदारांना काय सांगणार?

6 वर्षांपूर्वी देखील राज्य सरकारने अशीच कंत्राटी नोकर भरती करून शिपाई कामगार अशा पद्धतीची भरती केली होती. तोपर्यंत शासनाची गरज किंवा अडचण म्हणून हे सर्व योग्य वाटत होते. मागील दहा वर्षापासून हेच मोदी सरकार लाखो युवकांना सरकारी नोकरी देऊन अशी निवडणुकीत फसवी घोषणा करून सत्तेवर येते आणि त्याचेच राज्यात असणारे ट्रिपल इंजन सरकार हे केवळ त्यांच्या व्यापारी मित्रांचा फायदा करण्यासाठी काम करत आहे का? असा सवाल यावेळी करण्यात आला.

धनगर आरक्षण मिळेना… आता चौंडीत प्राणत्याग करणार, उपोषणकर्ते आक्रमक

त्यातच मागील हप्त्यात राज्य सरकारने शिक्षक देखील कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला 6 सप्टेंबर 2023 रोजी कंत्राटी पद्धतीनेच अधिकाऱ्यांची व त्यात महत्त्वाच्या कार्यालयीन पदाची भरती काढण्याचा घेतलेला शासन निर्णय निश्चित युवकांचे भवितव्य अंधारात लोटणारा असल्याने या व्यापारी सरकारचा आणि त्याच्या कंत्राटी शासनाचा जाहीर निषेध राष्ट्रवादी काँग्रेस युवक पार्टीच्या वतीने करण्यात आला आहे.

Tags

follow us