धनगर आरक्षण मिळेना… आता चौंडीत प्राणत्याग करणार, उपोषणकर्ते आक्रमक

धनगर आरक्षण मिळेना… आता चौंडीत प्राणत्याग करणार, उपोषणकर्ते आक्रमक

Dhangar reservation : आरक्षण मिळावे यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून धनगर समाजाकडून चौंडी येथे आंदोलन सुरु आहे. यातच गेल्या चौदा दिवसांपासून उपोषणकर्ते अण्णासाहेब रुपनवर यांची प्रकृती खालावली असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सरकारकडून आरक्षण दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप रूपनवर यांनी केला आहे. मात्र आता उपोषणकर्ते रुपनवर यांनी आक्रमक पवित्रा घेत प्राणत्याग करण्याचा इशारा दिला आहे.

धनगर आरक्षणासाठी गेल्या अनेक दिवसांपासून जामखेड तालुक्यातील चौंडी येथे आमरण उपोषण सुरु आहे. यातच प्रकृती खालावल्याने उपोषणकर्ते अण्णासाहेब रुपनवर यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपोषणकर्त्यांच्या भेट घेण्यासाठी व आंदोलन प्रश्नी तोडगा निघावा यासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली.

या प्रश्नी दोन दिवसात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षेतेखाली मंत्री मंडळाची बैठक घेऊन काहीतरी निर्णय घेतला जाईल असे आश्वासन महाजन यांनी उपोषणकर्त्यांना दिले.

Constitution House : जुन्या संसद भवनाला मिळाले नवीन नाव; PM मोदींनी केली मोठी घोषणा

मात्र दोन दिवस उलटून देखील काही एक निर्णय घेण्यात आला नाही. यामुळे आता उपोषणकर्ते रुपनावर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. सरकारकडून हे उपोषण दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच माझ्या प्रकृतीचे कारण पुढे करत मला पुणे येथे रुग्णालयात स्थलांतरित करण्याचा डाव प्रशासन आखात आहे असा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे.

अभिमानास्पद! UNESCO च्या जागतिक वारसा यादीत भारतातील 3 मंदिरांचा समावेश

समाजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे उपोषणकर्ते म्हणत आहे. तसेच चौंडी येथे मला जाऊन आता न्याय मिळेना यासाठी आता प्राणत्याग करण्याची माझी इच्छा असल्याचे रुपनवर यांनी म्हंटले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube